नवदाम्पत्यांचे आर्थिक प्रिवेडींग पान १

नवदाम्पत्यांचे आर्थिक प्रीवेडिंग 💍💰

शिंदे साहेब माझे गेल्या वीस वर्षांपूर्वी पासूनचे क्लायंट आहे ते असेच एक दिवस मागच्या हप्त्यात ऑफिसला आले जरा चिंतेमध्येच होते मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी त्यांची चिंता सांगितली. त्यांच्या मुलीचं लग्न जमत आहे परंतु त्यांना होणाऱ्या भावी जावयाबद्दल थोडी काळजी पण वाटत आहे म्हणून माझा सल्ला घेण्यासाठी आले आहेत असे त्यांनी सांगितले . विषय असाच पुढे गेला आणि मग त्यांनी सांगितलं की माझा जावई आर्थिक बाबतीत कसा आहे त्याचे आई-वडील हे आर्थिक बाबतीत कसे आहे त्यांच्यावरती किती कर्ज आहे त्यांच्या एकूण मालमत्ता किती आहे याबद्दल जर आपल्याला माहिती काढायची असेल तर ती कशी मिळू शकते . किंवा त्याला काय करता येऊ शकते.

मी सहजच विचारले की तुम्हाला यात काळजी सारखं काय वाटतंय ते म्हणाले की मी माझी मुलगी मी तळ हाताच्या फोडासारखी सांभाळली आहे आणि आता ती आम्हाला सोडून दुसऱ्या घरात जाणार आहे. आतापर्यंत मी तिच्या शिक्षणाची, लग्नाची जी काही आर्थिक जबाबदारी आहे ती फार काटेकोरपणे नियोजन करून पार पाडली आहे. तिला कुठलीही आर्थिक चणचण आजपर्यंत लागू दिली नाही. परंतु आता ती परक्याचं धन होणार आहे तर मला काळजी वाटते की नवीन घरामध्ये त्यांच आर्थिक वातावरण कस असेल आणि या सर्वांना ती ऍडजेस्ट करेल का.

मी त्यांना उलट प्रश्न केला आणि विचारले की आता तुमची ही मोठी मुलगी आहे तिचं लग्न होईल परंतु तुम्हाला एक छोटा मुलगा पण आहे आणि तुम्हाला पण सून घरात आणायची आहे तर तुम्हाला जे सून म्हणून देणार आहे त्या बापाची सुद्धा हीच काळजी असू शकते. यासाठी मुलाचे वडील म्हणून तुम्ही त्याबाबतीत काय काळजी घेऊ शकाल. आता ते थोडेसे जागेवर आले आणि सांगितलं की खरंतर हा विषय आपल्याकडे फार चर्चिला जात नाही. आपले लग्न साधारणतः पूर्वी मध्यस्थ व नातेवाईक याचे मार्फत जमायचे.

आता तर ऑनलाईन साइटवरून लग्न जमतात त्यांचा बायोडाटा बघून आणि कुणीतरी जवळचा नातेवाईक त्यांचा आणि आपला कुठेतरी दिसतो का हे बघितले जाते. खरंतर पूर्वी जेव्हा लग्न जमायची जेव्हा तो मध्यस्थ असतो त्याच्यावरती पूर्ण विश्वास टाकला जायचा आणि मुला मुलीचे आई-वडील सुद्धा थोडीफार चौकशी करायचे आणि लग्न पार पाडायचे . परंतु आता आर्थिक विषय असा झाला आहे की लोक त्यावर उघडपणे बोलत नाही आणि दोघांच्याही बाजूने आर्थिक बाबतीत काहीतरी गृहीत धरले जाते आणि लग्नानंतर लगेचच याबाबतीत कुरबुरी सुरू होतात.

ब्लॉग लेखन : सी ए राम डावरे , मोबाईल : ९०४९७८६३३३.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *