
आर्थिक प्री-वेडिंग: काळाची गरज ? 💰
लग्नानंतर आर्थिक समस्यांमुळे अनेक लोकांचे घटस्फोट होतात. हे टाळण्यासाठी लग्नाआधीच आर्थिक बाबींवर खुली चर्चा व्हायला हवी.
प्री-वेडिंग फॅड आणि आर्थिक बाजूची उपेक्षा 📸💸
आजकाल प्री-वेडिंगचं फॅड वाढलं आहे आणि त्यावर खूप खर्च होतो. पण आर्थिक प्री-वेडिंगवर कुणी बोलत नाही.
NRI मित्राचा सल्ला: अमेरिकेतील ‘प्री-वेडिंग मनी डेट’ 🇺🇸
माझ्या एका NRI मित्राने सांगितले की अमेरिकेत ‘प्री-वेडिंग मनी डेट’ ही संकल्पना आहे. यात मुलं-मुली ठराविक ठिकाणी भेटून फक्त आर्थिक बाबींवर चर्चा करतात. यासाठी प्री-वेडिंग मनी डेटचे सल्लागारसुद्धा असतात, जे दोन्ही कुटुंबांना मार्गदर्शन करतात.
आपल्याकडील स्थिती: आर्थिक चर्चा टाळली जाते 😟
आपल्याकडे प्री-वेडिंग होतं, पण त्यात आर्थिक बाबींची चर्चा कोणी करत नाही. मराठी माणसांमध्ये लग्नानंतर सर्व आर्थिक व्यवहार बघायची जबाबदारी मुलाकडे असते. हिंदू परंपरेमध्ये हे गृहीत धरलेलं असतं की मुलाने सर्व आर्थिक व्यवहार बघायचे आणि मुलीने घर किंवा नोकरी सांभाळायची.
बदलती परिस्थिती: मुलीसुद्धा आर्थिक प्रवाहात 👩💼
आता हे बऱ्यापैकी बदललेलं आहे. आता मुलीसुद्धा मुख्य आर्थिक प्रवाहात आल्या आहेत आणि आता मुलं-मुली स्वतःचे निर्णय स्वतः घेत असतात. त्यामुळे लग्नाआधी आर्थिक प्री-वेडिंगवर चर्चा होणे ही काळाची गरज आहे. आर्थिक प्री-वेडिंग म्हणजे मुला-मुलींनी त्यांच्या एकंदरीत आर्थिक सवयींविषयी एकमेकांना समजून घेणे, जाणून घेणे.
आर्थिक प्री-वेडिंगमध्ये विचारायचे प्रश्न ❓
आर्थिक प्री-वेडिंगमध्ये काही प्रश्न एकमेकांना विचारायचे असतात, ज्यातून काही अंदाज येऊ शकतो. असे काही प्रश्न:
- प्रत्येकाची आर्थिक संकल्पना काय आहे? 💡
- तुमची खर्चाची मानसिकता कशी आहे? खर्चाचे बजेट तयार करून त्यानुसार खर्च केला जातो का? 📊
- तुमची बचतीची मानसिकता कशी आहे? उत्पन्नातून किती बचत केली जाते? 🏦
- तुमच्या घरामध्ये आर्थिक निर्णय हे सर्वांशी चर्चा करून घेतले जातात का? 👨👩👧👦
- तुला किंवा तिला स्वतःला खर्चासाठी जे पैसे लागतात, ते स्वतः कमवावे लागतात की आई-वडील पुरवतात? 👨👩👧👦
- खर्च करण्यासाठी तुला किंवा तिला पैसे वाचवावे लागतात की ऑलरेडी त्यासाठी काही नियोजन केलेले असते? 🗓️
- स्वतःचे उत्पन्न काय आहे? 💰
- स्वतःवर कर्ज किती आहे? 💸
- तुझा क्रेडिट स्कोअर (सिबिल) स्कोअर किती आहे? 💯
- लग्नानंतर आपण आपले आर्थिक व्यवहार कसे करणार आहोत, एकत्र की वेगवेगळे? 🤝
वरील प्रश्नांतून एकंदरीत दोन्ही कुटुंबांतील आर्थिक बाबतीतला एक अंदाज केला जातो. परंतु असे प्रश्न विचारताना कुणी दुखावले जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठीच अमेरिकेत प्री-वेडिंग आर्थिक सल्लागार असतात.
आर्थिक प्री-वेडिंग का गरजेचं आहे? 🎯
आर्थिक प्री-वेडिंग गरजेचं आहे, कारण हे जर अगोदरच चर्चिले गेले नाही, तर लग्नानंतर बर्याचशा गोष्टी उघड होतात व आर्थिक कुरबुरी सुरू होतात आणि याचंच पर्यावसान भांडण व नंतर घटस्फोटात होतं.
दोन कुटुंबांचे मिलन 👨👩👧👦💞👨👩👧👦
आपल्या हिंदू धर्मात लग्न जमतात तेव्हा ते फक्त लग्न नसतं, दोन कुटुंबांचे मिलनसुद्धा असतं आणि हे मिलन होत असताना दोन्ही कुटुंबांनी अतिशय प्रामाणिकपणे आपल्या आर्थिक बाबी एकमेकांशी शेअर केल्या पाहिजेत. विशेषता मुलाकडच्यांनी हे आवर्जून मुलीकडच्यांसाठी शेअर करणं गरजेचं असतं की मुलावरती कर्ज किती आहे, कुटुंबावर कर्ज किती आहे, उत्पन्नाचे साधनं काय काय आहेत, खर्च करण्याच्या पद्धती कशा आहेत, यावरती प्रामाणिकपणे मतं शेअर करणे आवश्यक आहे.
माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस हे मी जबाबदारीने मुलीकडच्यांसोबत शेअर करेल, अशीच मानसिकता सर्वांची असायला हवी. आपल्याकडे प्री-वेडिंगला फक्त मुलगा, मुलगी आणि कॅमेरामन असतो, परंतु आर्थिक प्री-वेडिंगमध्ये मुलीचे आई-वडील व मुलाचे आई-वडील हेसुद्धा असणे फार गरजेचे आहे. त्यात लग्न जमवणारे मध्यस्थ, नातेवाईक किंवा मित्र जरी सामील झाले तरीही चालू शकेल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही कुटुंबांनी आपली आर्थिक माहिती प्रामाणिकपणे शेअर केली, तर हा विषय अतिशय आनंदाने आणि लग्नात कुठलेही विघ्न न येता किंवा लग्नानंतर कुठले विघ्न न येता तडीस नेता येईल. याची दुसरी बाजूसुद्धा आहे, दोन्ही कुटुंबाच्या आर्थिक बाबी उघड झाल्यास लग्न जुळताना काही अडचणीसुद्धा येऊ शकतात.
कर्जाची जबाबदारी 💸
अतिशय काळजीत असलेल्या शिंदे साहेबांनी मला शेवटचा प्रश्न विचारलाच की, समजा माझ्या जावयावरती लग्नापूर्वीचे काही कर्ज असेल, तर लग्नानंतर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी माझ्या मुलीची पण असेल का?
त्यांचा प्रश्न रास्त होता. याचे लीगल उत्तर म्हणजे, लग्नापूर्वीचे जे काही मुला-मुलींचे कर्ज असतात, ते फेडण्याची जबाबदारी त्या त्या मुलाची किंवा मुलीचीच असते. जरी मुलगी लग्न होऊन नवऱ्या घरी गेली, तरी लग्नाअगोदरच्या नवऱ्याच्या कर्जाची फेडण्याची जबाबदारी कायद्याने तिची राहत नाही. लग्नानंतर दोघांनी एकत्रित जर काही कर्ज घेतले, तर ती फेडण्याची जबाबदारी मात्र त्या दोघांवरती असते.
तर, असे हे आर्थिक प्री-वेडिंग फार महत्त्वाचा विषय आहे. विदेशात यावर खुली चर्चा होते, परंतु आपल्याकडे अजूनही याबाबत गांभीर्याने घेतले जात नाही. वेगवेगळ्या शादी डॉट कॉमवरून जमलेली लग्नं तर विना मध्यस्थी असतात. साधारणपणे लग्न जमवणारा मध्यस्थ मित्र किंवा नातेवाईक याने मुलामुलींची व दोन्ही घरांची आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन माहिती शेअर करावी. आर्थिक प्री-वेडिंग हा गरजेचा विषय आता झाला आहे.
याबाबतीत सखोल चर्चा झाल्यामुळे शिंदे साहेबसुद्धा खुश व चिंतामुक्त दिसत होते.
ब्लॉग लेखन : सी ए राम डावरे , मोबाईल : ९०४९७८६३३३.
