डेनिस डीडोरिएट इफेक्ट आणि आपले खर्च

🔥 डेनिस डिडरोट इफेक्ट: खरेदी करताना सावधान! 💸

रशियात डेनिस डिडरोट नावाचा एक अभ्यासू वाचक होता. इ.स. 1765 मध्ये त्याचे वय जवळ पास 52 वर्ष होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. त्याचे स्वत:चे मोठे ग्रंथालय होते. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात; पण गरिबीत गेले. मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते, इतका तो गरीब होता.

त्या वेळी रशियाची राणी कँथरीनला डेनिस डिडरोटच्या गरीबीबद्दल कळले. तिने डिडरोटला त्याच्याकडील लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 पौंड , म्हणजेच 50 हजार डॉलर्स म्हणजे आजचे जवळपास साडेतीन कोटी रुपये डिडरोटला देऊ केले. डेनिस डिडरोटने मान्य केले व त्याने आपले ग्रंथालय विकून टाकले.

डेनिस डिडरोट एका दिवसात खूप श्रीमंत झाला. त्याने त्या पैशातून लगेच ‘स्कार्लेट रॉब’; म्हणजे एक उच्च प्रतीचा व महाग असा पोषाख खरेदी केला. हा सदरा वापरत असताना त्याला वाटले की; आपण उच्च प्रतीचा पोषाख घालतोय; पण आपल्या घरात मात्र तशा उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या. किचन रूममधल्या वस्तू बदलल्या. फर्निचर बदलले. सगळं काही नवं नवं.

आता त्याचं संपूर्ण घर आणि पोषाख दोन्ही ही शोभून दिसत होते. परंतु हे सगळं केल्याने तो पुन्हा कंगाल झाला आणि कर्ज ही वाढत गेले. मोठ्या दु:खाने डेनिस डिडरोटने हे सहन केले आणि मग त्याने हे सगळे अनुभव आपल्या एका निबंधात लिहून ठेवले.

यालाच मानस शास्त्रातील ‘डिडरोट इफेक्ट’ (Diderot Effect) म्हणतात.

मोठे उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स, डेव्हलपर्स, राजकीय नेते, कॉर्पोरेट नेते (विजय मल्ल्या याचे उत्तम उहाहरण) सुद्धा; या ‘इफेक्ट’चा छुप्या पद्धतीने, अनावधानाने अवलंब करतात.

‘डिडरोट इफेक्ट’ म्हणजे काय? 🤔

समजा आपण महागडी गाडी घेतली; मग आपण गाडीला शोभेसे ड्रेस घेतो, त्याला मॅचिंग घड्याळ, पेन, बूट, गाॕगल …. इ. घेणार.

घरात मोठा टी.व्ही. आणला की चांगला टेबल, फर्निचर, HD वाहिन्या सुरु करणार. घराला नवा रंग लावला की त्याला मॅचिंग पडदे लावून सजावट करणार.

समजा आपण पन्नास हजार /एक लाखाचा मोबाईल घेतला; तरी आपल्याला आणखी काहीतरी कमी आहे असे वाटते. मग अजून मोबाईलला महागडा गोरील्ला ग्लास लावणार. 500 रुपयांचे जुने कव्हर बदलणार. शंभर रुपयांचा हेडफोन चालला असता; पण अडीच तीन हजाराचा हेडफोन घेणार. कारण या मोबाईलला स्वस्त वस्तू शोभून दिसत नाही.

हे सर्व कशासाठी? इतरांवर इंप्रेशन मारण्यासाठी. यालाच म्हणतात ‘डिडरोट इफेक्ट’

थोडक्यात सांगायचे तर; एक नवीन वस्तू विकत घेतली की; तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूचा दर्जा आपोआपच कमी होतो; आणि तो वाढविण्यासाठी आपण आणखी जास्त खर्च करीत जातो.

आपण एक वस्तू घ्यायला गेलो की; दुसऱ्या वस्तू आपोआपच घेतो; गरज नसली तरी. अशा पद्धतीने आपण एक एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारशा महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू घेत असतो; आणि ते आपणास कळत सुद्धा नाही.

म्हणजे; एका वस्तूमुळे दुसऱ्या वस्तूची गरज वाटणे आणि ती विकत घेणे. हाच तो ‘डिडरोट इफेक्ट’ (Diderot Effect) होय. ही सामान्य मानवी प्रवृत्ती (human tendency) आहे.

‘डिडरोट इफेक्ट’चे परिणाम काय? 😟

या प्रवृत्तीचे परिणाम भयानक होत असतात; पण ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपण नकळतपणे अनावश्यक खर्च करत जातो काही लोकांच्या हे लक्षात येतं; तर काहींच्या लक्षात खूप उशिरा लक्षात येतं पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही. म्हणून ते खूप खर्च करीत असतात

माणसाला खर्च करताना भीती वाटत नाही; पण नंतर हिशोब लागत नाही ; तेव्हा त्याचा त्रास होतो.

उपाय काय? 💡

म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करताना; या वस्तूची मला कितपत गरज आहे? असा स्वतःच स्वतःला प्रश्न विचारावा. विचार करून त्याचं उत्तर जर होय आलं तरच ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. असा निर्णय घेतल्यावर त्या वस्तूचा दर्जा आणि किंमत वाजवी आहे कां? याचा विचार करून मिळेल त्या किंमतीत न घेता ती वाजवी किंमतीत घेण्याचा प्रयत्न करावा.

दुकानदार एक वस्तू समोर ठेवतो; लगेच तो दुसरी वस्तू दाखवून संभ्रम निर्माण करतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की; ती वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध नसतो. तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंद ही संपतो आणि पैसे ही जातात.

म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे. पण त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावा लागतो.

घर मालमत्ता की देयता? माझ्या एका अर्थसाक्षरतेच्या सेमिनार मध्ये मी प्रश्न विचारला कि तुमचे राहते घर हि तुमची लॅबिलिटी आहे कि मालमत्ता आहे . बऱ्याच लोकांनी सांगितले कि मालमत्ता आहे, मग मी त्यांना विचारले कि जरा मालमत्ता आहे तर त्यापासून तुम्हला किती उत्पन्न मिळते, सर्वांनी सांगितले शुन्य उत्पन्न मिळते. मग त्या घरावर तुम्ही किती खर्च करता हे विचारले तर खर्चाची भली मोठी यादी तयार झाली मग सर्वांना समजले कि राहते घर हे मालमत्ता आहे कि लॅबिलिटी. अर्थात याला अपवाद म्हणजे स्वतःच्या घरात स्वतः मालक म्ह्णून राहण्याचा आनंद परंतु घर स्वतःचे असावे कि भाड्याने असावे हा निर्णय अनेक गोष्टी विचारात घेऊन घ्यावा लागतो हे हि खरे आहे .

‘डिडरोट इफेक्ट’ कसा टाळायचा? ✅

  1. स्वीकार करा (Acknowledge): पहिले आधी मान्य करा कि आपण गरज नसलेल्या वस्तू केवळ चांगले दिसावे म्ह्णून खरेदी करतो हे मान्य केले कि मग त्यावर हळू हळू नियंत्रण मिळविणे सोपे होऊन जाते.
  2. आर्थिक नियोजन (Budgeting): खरेदी करताना आपल्या आर्थिक परिस्थितीचे नीट आकलन करा , वर्षभरातील खरेदीचे बजेट आधीच ठरवा व त्यानुसार खरेदी करा.
  3. आनंदाची व्याख्या (Define Happiness): आपल्या आनंदाची नीट व्याख्या करा , भौतिक गोष्ठीतमध्ये किती आनंद आहे आणि तो आनंद मिळविण्यासाठी पैसेहि खर्च होतात . सोशल मीडियावरील जाहिराती बघून त्यात स्वतःचा आनंद शोधू नका. इतरांची लाईफ स्टाईल बघून तुमचे खरेदी निर्णय घेऊ नका.
  4. उपयुक्तता (Utility): वस्तूंची उपयुक्तता बघून खरेदी करा फक्त दिखाऊपणा साठी खरेदी करू नका.

📖🖋️ब्लॉग लेखन :
CA राम डावरे
मोबाईल नंबर : 9049786333

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *