
तुमची सोशल मीडिया पत आणि बँक कर्ज: Social Media Score & Loan Approval 📱🏦
माझ्या एका मित्राच्या मुलाचे जमलेले लग्न मोडले, याबाबत अधिक चौकशी केली असता असे समजले कि त्या मुलाचे सोशल मीडिया अकाउंट चेक केले गेले. तो फार वेळ सोशल मीडिया वर घालवतो, तो काही ठराविक एका मुलीच्या पोस्ट ला सतत उत्तर देतो व त्यावरून काही अंदाज बांधले गेले. मध्ये एक सोशल मीडियावर जोक आला होता कि लग्न जमविताना त्यांची कुंडली बघण्यापेक्षा त्यांचे सोशल मीडिया अकाउंट चेक करा.
सोशल मीडिया आणि कर्ज: तास असे हे तुमचे सोशल मीडिया अकाउंट तुम्हाला कर्ज देताना सुद्धा चेक केले जाते. बँका आणि वित्तीय संस्था कर्ज देताना कर्जदाराची बरीच चौकशी करत असतात . अशी चौकशी करत असताना पारंपारिक मार्ग आत्तापर्यंत वापरले जात होते जसे की कर्जदाराच्या घरी भेट देणे, कर्जदाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देणे, कर्जदाराच्या काही जमीनदारांकडे चौकशी करणे ह्या पारंपारिक चौकशी व्यतिरिक्त आता बँका सोशल मीडिया वरती तुमचे जे काही वेगवेगळे अकाउंट आहे त्यावर जाऊन सुद्धा कर्जदाराची मानसिकता काय आहे, कर्जदाराची सोशल स्टेटस काय आहे यावरून सुद्धा तुमचा क्रेडिट स्कोअर ठरवला जातो.
डॉक्टरांचे कर्ज नामंजूर: माझे एक डॉक्टर क्लाइंट आहे त्यांनी एक पर्सनल लोन ला अर्ज केले होता आणि त्यांचा सीबील स्कोअर हा बऱ्यापैकी होता. परंतु तरीही त्यांचे पर्सनल लोन अर्ज नामंजूर झाला. याचे कारण काय असू शकते याची चौकशी करण्यासाठी आम्ही दोघेही एका बँकेच्या कर्ज अधिकाऱ्याकडे गेलो तर आम्हाला अशी धक्कादायक माहिती मिळाली की सदर डॉक्टरांचे सोशल मीडिया स्कोअर फार कमी आहे.
आता ही सोशल मीडिया स्कोअर आणि तुमचे बँक लोन याचा काय संबंध आहे ही माहिती करून देण्यासाठी आजच्या लेखाचा उद्देश आहे. जे काही व्यवसायिक किंवा नोकरदार आहे ते पर्सनल लोन घेतात किंवा कुठली व्यक्ती पर्सनल लोन घेते त्यावेळेस सदर लोन ऑफिसर त्याच्या सोशल मीडिया वरती जाऊन त्याने केलेल्या सोशल मीडिया पोस्ट व इतर गोष्टी चेक केल्या जातात व त्यावरून सदर व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवले जाते. आता तुम्ही म्हणाल की आमच्या सिबिल स्कोअर ही भरपूर आहे तरी हे सोशल मीडिया स्कोअर काय प्रकार आहे.
तरी या संदर्भात संबंधित बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी आहे की जे काही कर्जदार आहे किंवा इतर कुठले लोक आहे ज्यांना पर्सनल लोन दिले जाते त्यांचे सीबील स्कोअर उत्पन्नाचे कागदपत्र त्यांच्या व्यवसायाची माहिती याच्याबरोबर त्यांची सोशल मीडियावर काय ऍक्टिव्हिटी आहे हे सुद्धा आम्ही चेक करतो. त्यावरून आम्हाला सदर कर्ज दाराची मानसिकता काय आहे याचा अंदाज बांधता येतो. हे करण्यासाठी बँक तुमचे जे काही सोशल मीडिया अकाउंट आहे जशी की फेसबुक ,ट्विटर, इंस्टाग्राम ,लिंकंडीन यावरती बँक तुमची चौकशी करते. तसेच गुगल सर्च करून सुद्धा तुमची माहिती काढली जाते.
(पान क्रमांक ४ वर)
📖🖋️ब्लॉग लेखन :
CA राम डावरे
मोबाईल नंबर : 9049786333
