
सोशल मीडियावर तुमची पत: बँक कर्जासाठी सोशल मीडिया स्कोअर! 😲
(पान क्रमांक ३ वरून)
जशी मी वर सांगितले की इतर सर्व ठीक आहे तुमच्या सिबिल स्कोअर चांगला आहे तरीही बँक हा सोशल मीडिया स्कोअर हा कशासाठी वापरते हे सुद्धा महिती करून घेणे गरजेचे आहे. बँका तुमच्या सोशल मीडियावर खालील माहिती घेत असतात:
१. तुम्ही किती खर्चिक आहात: 💸
आपण कुठेही फिरायला गेलो, काही नवीन वस्तू खरेदी केली, कार खरेदी केली, कुटुंबातील व्यक्तीचे वाढदिवस साजरे केले, मित्रांचे वाढदिवस साजरे केले तर आपण ते लगेच सोशल मीडियावर फोटो व माहिती टाकतो . अश्या पोस्टमधून बँका अंदाज करतात की तुमची पैसे खर्च करण्याची मानसिकता कशी आहे वारंवार फिरायला जाणे, सतत नवीन वस्तू घेणे यातून तुमच्या खर्चाची मानसिकता तपासली जाते . त्यातून तुमचा कर्ज परतफेडीचा कल कसा असू शकेल याचा अंदाज केला जातो.
२. सत्यता तपासणी: 🕵️♀️
दुसरे सर्वात महत्त्वाचे तुम्ही बँकेला कर्ज घेण्यासाठी जो अर्ज करता त्यामध्ये तुमच्या व्यवसायाची किंवा नोकरीची माहिती तुमचा व्यवसायाचा किंवा नोकरीचा पत्ता व तुमचा घरचा पत्ता हा तुमच्या सोशल मीडियावरील पत्ता सोबत जुळत आहे का हे सुद्धा चेक केले जाते आणि जर तो जुळत नसेल तर तुम्ही खोटी माहिती बँकेला देता त्यामुळे तुमचे नेचर कसे आहे याचा अंदाज बँक लावते.
३. तुमची सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी: 👍👎
तुमचे सोशल मीडियावर अकाउंट किती दिवसापासून आहे ही माहिती तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही यासाठी वापरली जाते. तसेच तुम्ही सोशल मीडियावरती काय पोस्ट करता त्याला तुमचे मित्र किंवा इतर लोक काय प्रतिक्रिया देतात तुमचे फॉलोवर किती आहे हे सुद्धा बघून तुमची पत निश्चिती केली जाते . तुम्ही सतत काही वादग्रस्थ पोस्ट टाकत असतात काय यावरून हि काही अंदाज लावले जातात .
४. कामात व्यस्त की रिकामटेकडे? ⌚
तुम्ही सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह आहे, तुम्ही सोशल मीडियावर किती वेळ घालवतात यावरून तुम्ही तुमचा कामात व्यस्त आहे कि रिकामटेकडे आहेत व त्यावरून तुमचे उत्पन्न किती असू शकते याचाहि अंदाज लावला जातो.
५. व्यवसायाचा वापर: 💼
तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचा व्यवसाय वृद्धी साठी तुम्ही तुमचा सोशल मीडियाचा वापर करता कि नाही का फक्त त्यावर टाईमपास करतात यावरूनहि काही अंदाज बांधले जातात.
६. सामाजिक संस्थेशी जोडलेले आहात का? 🫂
तुम्ही एखाद्या सोशल संस्थेबरोबर जोडले गेले आहेत का नाही हे सुद्धा तुमच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे बघितले जाते .
७. मित्र आणि प्रतिसाद: 🧑🤝🧑
तुमचे सोशल मीडियावर किती मित्र आहे, ते कुठल्या कॅटेगरी चे आहे, तुमच्या एखाद्या पोस्टला त्यांचा प्रतिसाद कसा आहे हे सुद्धा बघितले जाते.
८. राजकीय संबंध: 🏛️
तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का किंवा त्याचे पदाधिकारी आहेत का यावरून सुद्धा तुमचा सोशल मीडिया स्कोअर काढला जातो . बऱ्याच बँका आणि वित्तीय संस्था राजकारणी, वकील व पोलीस विभागातील लोकांना कर्ज देत नाही .
सोशल मीडिया स्कोअर आणि ५ C: 💯
या सोशल मीडियाचा किंवा सोशल स्कोअर चा वापर पाच सी चेक करण्यासाठी केला जातो:
- कॅरेक्टर (Character): तुमचे चारित्र्य
- कॅपॅसिटी (Capacity): लोन परत करण्याची क्षमता
- कोलॅटरल (Collateral): सिक्युरिटी काय देऊ शकतात
- कंडिशन (Condition): तुम्हाला कर्ज देतांना काय काय अटी टाकायच्या.
तर या पाच सी वरती तुमचं सोशल मीडिया स्कोअर चेक केला जातो.
डिजिटल लेडिंग आणि एआय (Digital Lending & AI): सुरुवातीला सर्वांना हे नवीन वाटते परंतु आता बँका तुमच्या सोशल मीडियावरती किंवा गुगल वरती तुमच्याबद्दल माहिती घेऊन तुम्हाला लोन द्यायचे की नाही हे ठरवत आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेचे कुठलेही सर्क्युलर किंवा आदेश नाही परंतु कर्जदाराची पत ठरविताना काय काय बघावे हे त्या त्या वित्तीय संस्थेवर अवलंबून आहे.
सर्वच बँका आणि वित्तीय संस्था आता डिजिटल लेडिंग कडे वळत आहे आणि आर बी आय ने सुद्धा याला मान्यता दिलेली आहे. तुमचे सोशल मीडिया अकाउंट चेक करताना बँका ए आय चा सुद्धा करतात ज्याद्वारे तुमचा मेल आय डी आणि मोबाईल नंबर वापरून तुमच्या सोशल मीडिया बाबत माहिती घेतली जाते व त्यावरून एक रिपोर्ट तयार केला जातो.
त्यामुळे तुम्ही पगारदार असाल किंवा व्यावसायिक असाल तर तुम्ही सोशल मीडियावर काय टाकता, काय पोस्ट शेअर करता याची काळजी घेणे जरुरी आहे . आता तरी बँक व वित्तीय संस्था ह्या विनातारण कर्जासाठी ह्या सोशल मीडियाचा वापर करत आहे . पर्सनल लोन व विनातारण लोन घेणाऱ्याची सुद्धा संख्या फार मोट्या प्रमाणात आहे त्यावरून आपल्या सोशल मीडियावर आपण काय शेअर करते, काय पोस्ट टाकतो यासाठी व्यावसायिकांनी सजग राहावे .
📖🖋️ब्लॉग लेखन :
CA राम डावरे
मोबाईल नंबर : 9049786333
