शेअर मार्केट फुगलय काळजी घ्या पान १

शेअर मार्केट फुगलेय, जरा काळजी घ्या! (आणि चार्ली मंगर यांचे मार्गदर्शन) ⚠️

प्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार चार्ली मंगर यांचे दिनांक 28 नोव्हेंबर 2023 या दिवशी वयाच्या 99 वर्षी निधन झाले. गुंतवणूक क्षेत्रातील वॉरन बफेट आणि चार्ली मंगर ही जोडी सर्वांना परिचितच आहे. चार्ली मंगर यांचे निधन झाले त्या दिवशी त्यांची एकूण संपत्ती 21000 कोटी रुपये होती असं विविध माध्यमांमध्ये वाचण्यात आलं. गुंतवणुकीतील एवढी संपत्ती मिळवणं हे फार मोठं काम आहे त्यांनी त्यांच्या जीवनात अशीच अनेक कोटींची संपत्ती विविध सामाजिक कार्यासाठी(चॅरिटी) दान सुद्धा केलेली आहे.

भारतीय भांडवली बाजाराचा सेन्सेक्स हा नुकताच ७१००० चा आकडा पार करून पुढे जात आहे. भारतातील भांडवली बाजारात नागरिकांचा सहभाग खूपच कमी होता; फक्त उच्च मध्यमवर्ग आणि काही प्रमाणात पगारदार वर्ग शेअर्स मध्ये गुंतवणुकी करायचा. १४० कोटीच्या लोकसंख्येत फक्त काही वर्षांपूर्वीपर्यंत डिमॅट अकाउंट ची संख्या फक्त ३ कोटी होती. नागरिकांमध्ये जोखीममुक्त सार्वजनिक बँकांतील मुदत ठेवी; पोस्ट ऑफिसच्या स्कीम्स याला अधिक प्राधान्य होते.

जागतिक आणि भारतीय वित्त भांडवलशाहीला भारतातील भांडवली बाजाराचा पाया व्यापक करायचा होता; त्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांनी स्टॉक मार्केटमध्ये आपल्या बचती गुंतवणे आवश्यक होते. शासनाचे उद्दिष्ट होते आपल्या अर्थसंकल्पावरील व्याजरूपी भार कमी करण्याचे; कारण पोस्ट ऑफिसच्या योजना, पीपीएफ इत्यादी वरील व्याज केंद्र सरकारच्या तिजोरीतून जाते पण लोक स्वतःहून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत नव्हते.

बँकांतील बचत ठेवी / मुदतठेवी यावरचे व्याज गेल्या काही वर्षात अतिशय निर्दयी पद्धतीने कमी कमी करण्यात आले. भारतीय पोस्ट मार्फत अनेक अल्पबचत योजना राबवल्या जातात उदा. नॅशनल सेविंग, किसान विकास, पीपीएफ, मंथली इन्कम स्कीम इत्यादी; त्यावरील व्याज सातत्याने कमी करीत नेले.

दुसऱ्या बाजूला राहणीमानाच्या आकांक्षा वाढत होत्या, त्याप्रमाणात आमदनी वाढत नव्हतीच पण महागाई मात्र वाढत होती; महागाई वाढल्यावर आपल्या बचतीवर बऱ्यापैकी परतावा मिळावा अशी प्रबळ इच्छा कोट्यवधी नागरिकांची तयार झाली. पोस्टातील दरवर्षी नव्याने उघडल्या जाणाऱ्या अल्पबचत खात्यांची संख्या दरवर्षी कमी होत गेली आणि डिमॅट अकाउंट ची संख्या दरवर्षी वाढत गेली. २०१८-१९: ३ कोटी असणारी डिमॅट संख्या नोव्हेंबर 2023 मध्ये १३ कोटी झाली.

सिस्टिमॅटिक इन्हेस्टमेन्ट प्लॅन्स (एसआयपी) मध्ये गुंतवणूकदार वाढत आहेत, म्युच्यअल फंडांचे गुंतवणूकदार सुद्धा वाढत आहेत, बँका असुरक्षित कर्जे देतात त्यातून मोठा वाटा शेअर्स मधील गुंतवणुकीत जातो, विमा, पेन्शन कंपन्या प्रॉव्हिडंट फंड याना देखील शेअर बाजारात काही प्रमाणात गुंतवणुकीची परवानगी देण्यात आली.

एक काळ असा होता कि परकीय गुंतवणूकदार संस्थांनी कोट्यवधी डॉलर्सच्या गुंतवणुकी केल्या कि स्टॉक मार्केट वर जायचे, त्यांनी काढून घेतल्या कि खाली यायचे सेन्सेक्स ६०,००० वरून ७०,००० वर जाण्याच्या काळात परकीय गुंतानुकदारांनी ७०,००० कोटी रुपये शेअर्स च्या निर्गुंतवणुकी केल्या तर त्याच काळात देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ५, २३,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकी केल्या आहेत.

भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ही वाढतच आहे परंतु चार्ली मंगर आणि वॉरेन बफेट या जोडीने गुंतवणूक क्षेत्रात एवढी मोठी प्रगती कशी केली हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्याकडे शेअर मार्केट म्हणजे जुगार, शेअर मार्केटमध्ये पैसे लावणे म्हणजे जुगारात पैसे खेळणे आणि शहान्याने सुद्धा शेअर मार्केटमध्ये पैसे लावू नये असे म्हटले जाते. परंतु गुंतवणूक आणि शेअर मार्केट यातूनच आपल्या आयुष्यात करोडोची संपत्ती मिळवता येते हे हे चार्ली मंगर आणि वॉरंट बफेट ह्या जोडीने जगासमोर उदाहरण दाखवून दिले आहे. परंतु अशी संपत्ती मिळवताना त्यांनी खूप सारे नियम पाळलेले आहे आणि हे नियम जर आपण सुद्धा पाळले तर सर्वसामान्य गुंतवणूकदार सुद्धा अशी संपत्ती मिळू शकतो हे एक उदाहरण आपल्यासमोर त्यांनी घालून दिलेले आहे त्यांनी पाळलेले काही नियम या लेखांमध्ये आपण समजून घेऊ:

चार्ली मंगर आणि वॉरेन बफेट यांचे गुंतवणुकीचे नियम 💡

  1. दीर्घकालिक दृष्टिकोण (Long-Term Vision):
    • मंगर आणि बफेट दीर्घकालिक निवेशाची गरज मानतात. त्यांनी अचूक निवडक शेअर्समध्ये निवेश करून त्यांची मूल्ये वाढविण्यात मदत केलेली आहे.
    • गुंतवणूक करून पैसा तसाच ठेवून द्या गुंतवणुकीत यशस्वी व्हायचा असेल तर तुम्हाला व्यवसायाचं किंवा स्टॉक प्रत्यक्ष मूल्य माहीत असण्याची गरज असते त्यानंतर बाजारात तुमच्या गुंतवणुकींना अमर्याद पणे तसेच सोडून द्या आणि ट्रेडिंग करू नका योग्य मैदानावरून उसळी घ्या वर्षातून कधीकधी तुमचं म्हणणं योग्य असेल कालावघात बाजाराचा कल वर चढण्याकडे असतो स्टॉकच्या दैनंदिन चढउतारांचा पाठपुरा करत राहू नका.
    • सर्वसामान्य अर्थकारणाची काळजी करत बसू नका कारण दर शंभर वर्षांत पंधरा वाईट वर्ष असतात आज पासून एका दिवसात एका आठवड्यात एका महिन्यात किंवा एका वर्षात काय घडेल याचा अंदाज कोणी बांधू शकत नाही.
    • आजकाल रात्रीतून श्रीमंत होईल ह्या आशेने शेअर मार्केट कडे बघितले जाते. त्यासाठी अनेक तरुण गुंतवणूकदार हे इंट्रा डे ट्रेडिंग आणि फुचर व ऑप्शन ट्रेडिंग करत आहे. परंतु अनेक जण यात बरबाद झाले आहे.
    • त्यासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन ठेऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला मंगर आणि बफेट देतात. खास करून तरुणांनी लवकरात लवकर गुंतवणुकीस सुरवात करणे आवश्यक आहे.
  2. शेअर योग्य किमतीला (मूल्य) खरेदी करणे (Buy at the Right Price): 🏷️
    • ह्या दोघांची शेअर्स चे मूल्य काढण्याची एक विशिष्ट पद्धत विकसित केलेली होती त्यानुसार ते शेअर्स चे मूल्य काढत असत आणि त्या मूल्याच्या बरेच खाली तो शेअर्स मिळत असतील तरच ते तो खरेदी करत.
    • मग भलेही त्याची किंमत येण्यासाठी ते वर्ष वर्ष वाट बघावी लागली तरी ते वाट बघत परंतु ते घाईने कधीही गुंतवणूक करत नव्हते.
    • आता आपलं शेअर बाजार हा फार गतीने वाढत आहे परंतु गतीने वाढत आहे म्हणजे लगेच तुम्ही कुठल्याही किमतीला शेअर्स विकत घ्यायचे हे त्यांना मान्य नाही.
    • मार्जिन ऑफ सेफ्टी विचारात घेणे खूप महत्वाचे आहे.

(पान क्रमांक ४ वर)

📖🖋️ब्लॉग लेखन :
CA राम डावरे
मोबाईल नंबर : 9049786333

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *