शेअर मार्केट फुगलय काळजी घ्या पान २

शेअर मार्केट फुगलेय, जरा काळजी घ्या! (भाग २: गुंतवणुकीचे नियम) 🚀💰

(पान क्रमांक 3 वरून)

३. कळपातील विचार टाळा: स्वतंत्र विचार करा! 🐑

ज्यावेळी गुंतवणुकीचे अवमूल्यन झालेलं असतं त्यावेळी त्यांची खरेदी करणे हा उत्तम गुंतवणुकी करण्याचा सर्वच अधिक विश्वासाचा मार्ग असतो. जवळजवळ दरवेळीच अवमूल्यन झालेली गुंतवणूक ही फारशी लोकप्रिय नसते त्या उलट कळपातील एक होऊन जाण्याची वृत्ती असलेले गुंतवणूकदार इतर सगळे करत असलेल्या गोष्टीच करत असतात त्यामुळे ज्यावेळी किमती चढ्या असतात त्यावेळी खरेदी करणे टाळा व भाव खूपच घसरलेले असतात त्यावेळी ते गुंतवणुक खरेदी करा.

थोडक्यात उत्तम कंपनीचे शेअर चांगल्या किमतीला खरेदी करा. कुठल्याही कंपनीचे शेअर्स तिच्या अंगभूत किमतीच्या तुलनेत किती कमी किमतीत आपण खरेदी करतो त्यावर तुमचा परतावा अवलंबून असतो.

४. उद्योगाची समज: 🧐

ज्या कंपनीचे शेअर्स तुम्ही विकत घेणार आहे त्या कंपनीच्या व्यापाराची समज घेणे महत्वाचे आहे . तुमच्या आकलन क्षमतेच्या क्षेत्रामध्ये राहून ज्या कंपन्यांना तुम्ही समजून घेऊ शकता ज्या कंपन्यांना तुम्ही जाणता त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा असा सल्ला हे देतात. कारण त्यामुळे तुम्हाला कोणत्या वेळी योग्य मैदानावर चेंडू कसा उचलला पाहिजे हे बरोबर समजतं .

  • ज्या कंपन्या दीर्घ काळापर्यंत यशस्वीपणे पाय रोवून उभे असतात त्या भविष्या काळातही यशस्वी होतात.
  • तुम्हाला ज्या कंपनीचे बिजनेस मॉडेल समजत नाही त्या कंपनी पासून उर राहा.

आजकाल नवीन कंपन्यांचे आय पी वो (IPO) फार मोट्या प्रमाणात येत आहे त्यात गुंतवणूक करताना अतिशय सावध असणे गरजेचे आहे.

  • कंपनीचे आर्थिक पत्रकांचे आकलन करू ते समजून घेणे सुद्धा फार महत्वाचे आहे.
  • त्यातही काही रेशो समजून घेऊन ते रेशो गुंतवणूक करताना विचारत घेतले गेले पाहिजे असेही हे दोघे सांगतात.

तसेच कुठल्याही कंपनीविषयी माहिती तुम्हाला फक्त आकडेवारी वरून मिळत नाही.

  • त्या कंपंनीचे ग्राहक, स्पर्धक, सल्लागार, व्यवस्थापक, माजी कर्मचारी आणि विक्रेते यांचेकडून सुद्धा माहिती मिळविणे गरजेचे असते.
  • बफे आणि मंगर नेहमी त्यांनी ज्या कंपनीत गुंतवणूक केली आहे त्या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांशी तासनतास बोलत असत. कंपनीचे माजी कर्मचारी हा उपयुक्त माहितीचा अत्यंत प्रभावी मार्ग आहे.

५. कंपनीच्या मॅनेजमेंटची गुणवत्ता: 👨‍💼

ज्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करणार आहे ती कंपनी कोण चालवत आहे तिचे मॅनेजमेंट कोण बघत आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे . कंपनीच्या मॅनेजमेंटवरच ती कंपनी पुढे कशी वाढत जाईल, नफा मिळवेल व तुमच्या स्टॉक वर उच्य परतावा देईल हे ठरत असते.

  • अंतिमतः कंपनीचा कारभार हे मेनेजमेंटच बघत असते .त्याची गुणवत्ता तपासणे हे फार महत्वाचे आहे . अनेक चांगल्या कंपन्या ह्या चुकीच्या लोकांच्या हातात गेल्या कि त्याची वाताहात झालेली आपण बघत असतो.
  • बफेट आणि मंगर गुंतवणूक करण्याआधी कंपनी मॅनेजमेंट च्या लोकां सोबत तासंनंतास चर्चा करत असत. आजसुद्धा कंपनी मॅनेजमेंट मध्ये कोण लोक आहे हे आपण त्याच्या वेबसाइटवरून किंवा रिसर्च रिपोर्ट मधून समजून घेऊ शकतो.
  • काम करणारे व्यवस्थापक स्वतःला व्यवसायाचे मालक समजतात आणि त्यानुसार काम करतात ते प्रत्यक्षात कंपनीच्या मालकाच्या हितासाठी काम करतात . असे व्यवस्थापन फार कमी कंपनीला मिळत असते.

६. योग्य वृत्तीचा विकास करा: 🧘

यश टिकून ठेवण्यासाठी गुंतवणूकदारांनी विशिष्ट वृत्ती अंगी बाळगण्याची गरज आहे. एखाद्या प्रवाहाच्या किंवा निर्णयाच्या मागच्या कारणे शोधण्याची आवश्यक असलेली मानसिकता ही महत्त्वाची आहे . योग्य वृत्ती असणे हा यशस्वी गुंतवणूक करण्यातील एक महत्त्वाचा घटक आहे.

  • बहुतेक लोक अत्यंत असामान्य असतात आणि सतत कुरकुर करत राहतात ते अवास्तव काळजी करत राहतात.
  • यश याचा अर्थ अत्यंत संयमी असणे पण प्रसंगी आक्रमक होणं महत्वाचे आहे . जेव्हा शेअर भाव खूप पडलेले असतात तेव्हा आक्रमक पणे खरेदी करणे गरजेचे आहे.
  • तुमच्या स्वतःच्या कठोर अनुभवातून शिकण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांच्या अनुभवातून अधिक कठोर धडे शिकलात तर ते अधिक चांगलं असतं.

परंतु फक्त स्वभाव किंवा वृत्ती एकटीने हे करू शकत नाही तुमच्याकडे खूप दीर्घकाळासाठी चौकसपणा किंवा जिज्ञासा असण्याची गरज असते.

  • बहुतेक लोकांना योग्य विचार आत्मसात करता येत नाहीत किंवा त्या विचाराचे काय कराव ते समजत नाही.
  • ते सांगतात कि उच्च बुध्यांक असलेली व्यक्ती ही कोणत्याही क्षेत्रातील यशाची हमी देत नाही परंतु इतर जे घटक असतात त्यामध्ये प्रेरणा, नेतृत्व गुण, चिकाटी, संवाद व संपर्क कौशल्य आणि बाहेरच्या जगात हुशारीने वागणं ह्या गोष्टींना फार महत्त्व आहे.
  • त्यांनी आयुष्यात कधीच गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने गुंतवणुकी केल्या नाही हे ते आवर्जून सांगतात.

७. कंपनीचा शाश्वत स्पर्धात्मक लाभ: 🛡️

कंपनीकडे शाश्वत स्पर्धात्मक लाभ आहे का हे प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराने गुंतवणूक करताना विचारायला हवे.

  • त्या क्षेत्रातील इतर कंपन्यांशी ही कंपनी किमतीच्या संदर्भात आक्रमणे स्पर्धा करते का?
  • कंपनीला ग्राहकांचा भक्कम पाठिंबा आहे का?
  • व्यवस्थापन पारदर्शक व सक्षम आहे का? आणि त्यांनी न्यायपणे परतावे दिले आहेत का? हे सर्व गुंतवणूक करताना विचारात घेणे गरजेचे आहे .

८. सतत वाचन करा: 📚

बफे आणि मंगर हे दोघेही प्रचंड वाचन करतात ते अगदी आधाशी पणे वाचन करणारे वाचक आहेत. बौद्धिक दृष्ट्या चौकस लोकांना इतर अनेक क्षेत्राविषयी भरपूर माहिती मिळवायला आवडते हे यामागचे एक साधं कारण आहे.

  • त्यामुळे त्यांना चांगली व्यावसायिक समज प्राप्त होते. विद्वान असलेली पण वाचन करत नसलेली कोणतीही व्यक्ती आम्हाला माहिती नाही असे ते नेहमी म्हणत .
  • इतकं पुरेसं नाही तर तुमच्या स्वभावात कल्पना आणि सुज्ञपणाच्या गोष्टी आत्मसात करण्याचा गुणधर्म ही असावाच लागतो. बहुतेक लोकांना योग्य विचार आत्मसात करता येत नाहीत किंवा त्या विचाराचे काय कराव ते समजत नाही.
  • ते सांगतात कि उच्च बुध्यांक असलेली व्यक्ती ही कोणत्याही क्षेत्रातील यशाची हमी देत नाही परंतु इतर जे घटक असतात त्यामध्ये प्रेरणा, नेतृत्व गुण, चिकाटी, संवाद व संपर्क कौशल्य आणि बाहेरच्या जगात हुशारीने वागणं ह्या गोष्टींना फार महत्त्व आहे.

९. आकलन क्षमतेच्या क्षेत्रात राहा: 🧠

गुंतवणूकदार त्यांच्या विशिष्ट माहितीच्या क्षेत्राच्या वर्तुळात राहत नाही. ज्या कंपन्यांना तुम्ही समजून घेऊ शकता ज्या कंपन्यांना तुम्ही जाणता ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा.

  • कारण त्यामुळे तुम्हाला कोणत्या वेळी योग्य मैदानावर चेंडू कसा उचलला पाहिजे हे बरोबर समजतं ज्या कंपन्या दीर्घ काळापर्यंत यशस्वीपणे पाय रोवून उभे असतात त्या भविष्या काळातही यशस्वी होतात.

१०. आपत्तीमध्ये तग धरून राहा: ⛈️

बफे आणि मंगर याना अनेक वेळा गुंतवणुकीमध्ये तोटा सुद्धा सहन करावा लागला.

  • परंतु ते कधीही विचलीत झाले नाही. चुकांनमधून सतत शिकत जाणे आणि पुन्हा त्या चुका न करणे व त्या टाळण्यासाठी कठोर संयम बाळगणे याला ते महत्व देतात.

११. गुंतवणुकीचे ३ महत्वाचे प्रश्न: 🤔

बफे आणि मंगर गुंतवणूक करताना तीन महत्वाच्या प्रश्नाकडे नेतात:

  1. पहिला प्रश्न ज्या व्यवसायांना आपण समजू शकतो किंवा ज्याचे आकलन होत आहे त्यात आपण गुंतवणूक करत आहे का ?
  2. दुसरा प्रश्न त्या कंपनीला अनुकूल दीर्घकालीन भविष्य आहे का ?
  3. आणि तिसरा प्रश्न त्या कंपनीचे शेअर्स अतिशय आकर्षक किमतीला उपलब्ध आहे का ?

हे तीन प्रश्न जर होकारार्थी असतील तरच गुंतवणूक करण्याचा सल्ला ते दोघे देतात.

📖🖋️ब्लॉग लेखन :
CA राम डावरे
मोबाईल नंबर : 9049786333

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *