उत्पन्नाचे क्लबिंग आणि आयकर कायदा

आयकर कायदा आणि उत्पन्नाचे क्लबिंग: कायदेशीर माहिती! ⚖️

आयकर कायद्यानुसार वैयक्तिक माणसाला आयकरच्या स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागतो. आयकर करदाते नेहमी आपले उत्पन्न जेवढे खालच्या स्लॅबमध्ये राहील तेवढा टॅक्स कमी लागेल हे बघत असतात. मग जरी 10 लाखांच्या वर उत्पन्न जात असेल तर ते स्वतः मिळवलेले उत्पन्न हे बायको/नवरा, मुलगा, मुलगी, आई वडील यांनी मिळवलं आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि फसतात.

तर स्वतःचे उत्पन्न, स्वतःच्या प्रॉपर्टीपासून मिळालेले उत्पन, स्वतःच्या व्यवसायात लाईफ पार्टनर, आई किंवा वडील यांना पगार दाखविणे असे अनेक प्रकार करतात आणि करचुकवेगिरी करतात. असे केले तरी ते उत्पन्न तुमचे स्वतःचे आहे असे आयकर कायदा मानतो व तुमच्या उत्पन्नात ते वाढविले जाऊन जास्त स्लॅबने टॅक्स लागू शकतो.

तर असे करताना काय काळजी घेणे गरजेचे आहे यावर करदात्यांना मार्गदर्शन करणे साठी हा ब्लॉग प्रपंच आहे. ह्या सर्व बाबी आयकर कायदा 1961, कलम 60 ते 64 मध्ये दिलेल्या आहे.

क्लबिंगचे नियम: काय टाळावे? 🚫

  1. तुम्ही स्वतःचे उत्पन्न पती,पत्नी,मुलगा, आई वडील यांचे आहे असे दाखवू शकत नाही, तसे केले तरी ते तुमचे उत्पन्न आहे असे मानले जाते व तुम्हाला स्लॅब रेट नुसार टॅक्स भरावा लागते.
  2. प्रॉपर्टी ट्रान्सफर न करता त्या प्रॉपर्टीचे उत्पन्न हे तुमचे नसून पती/पत्नी मुलगा, मुलगी, आई वडील यांचे आहे असे तुम्ही दाखवू शकत नाही.
  3. तुम्ही तुमची प्रॉपर्टी विनामोबदला पती, पत्नी मुलगा मुलगी आई वडील यांना गिफ्ट केली तर त्या प्रॉपर्टी पासून आलेले उत्पन्न हे तुमच्या उत्पन्नात पकडले जाईल.
  4. तुम्ही एखादी प्रॉपर्टी तुमच्या सुनेला विनामोबदला गिफ्ट केली तरी त्या प्रॉपर्टी पासून आलेले उत्पन्न हे तुमचे पकडले जाईल.
  5. तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि फक्त नफा कमी करण्यासाठी तुम्ही तुमची बायको/नवरा यांना कमिशन किंवा पगार दाखवला तर तो नवरा किंवा बायको पैकी ज्याचे उत्पन्न जास्त आहे त्यात मिळवून त्यावर टॅक्स काढला जाईल.

वरील गोष्टी काही उदाहरणे देऊन आणखी समजावून घेऊ या:

उदाहरणे: अधिक स्पष्टता 💡

  • उदाहरण नंबर -१: माझा स्वतःचा व्यवसाय आहे आणि मला जास्त टॅक्स येत आहे म्हणून मी माझ्या व्यवसायात माझ्या पती किंवा पत्नी ला पगार किंवा कमिशन दाखवू शकतो का ?
    • उत्तर: नाही दाखवत येणार आणि जरी दाखवले तर ते तुमचेच उत्पन्न पकडले जाऊन तुम्हाला तुमच्या स्लॅब रेटने त्यावर टॅक्स भरावा लागेल. जर त्यांना व्यावसायचे काही तांत्रिक ज्ञान असेल तर ते तुमच्या उत्पन्नात क्लब होणार नाही. म्हणजे तुमच्या व्यावसायायात असे पगार खर्च दाखविताना त्याना त्या व्यावसायाचे काही तांत्रिक ज्ञान एके हि नाही हे सुद्धा बघणे महत्वाचे आहे.
  • उदाहरण नंबर २: माझे स्वतःचे मालकीचे घर किंवा शॉप आहे त्याचे येणार भाडे मी माझ्या बायको, नवरा, मुलगा, मुलगी, आई वडील यांचे नावे उत्पन्न दाखवू शकतो का ?
    • उत्तर: नाही दाखवू शकत, प्रॉपर्टी तुमची आहे तर त्याचे येणारे भाडे तुमच्या उत्पन्नात पकडले जाईल. म्हणजेच त्या प्रॉपर्टीचा मालक कोण आणि ती कुणाच्या उत्पन्नातून खरेदी केली आहे हे बघणे महत्वाचे आहे.
  • उदाहरण नंबर ३: माझे स्वतःचे घर किंवा काही प्रॉपर्टी आहे आणि ते मी माझ्या नवरा, बायको, मुलगा, मुलगी, आई, वडील व इतर कुणालाही विनामोबदला गिफ्ट दिली आणि त्यापासून येणारे भाडे, उत्पन्न हे कुणाचे पकडले जाईल?
    • उत्तर: विनामोबदला गिफ्ट दिलेले प्रॉपर्टीचे उत्पन्न हे गिफ्ट देणाऱ्याच्या उत्पन्नात पकडले जाईल. त्यामुळे उत्पन्न चुकविण्यासाठी विनामोबदला गिफ्ट देताना जरा काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच अशी गिफ्ट हि देणाऱ्या साठी लाइफटाइम असेल व परत घेतली जाणार नसले(irrevocable) तर असे उत्पन्न हे ज्याला गिफ्ट दिली आहे त्याचे पकडले जाईल.
  • उदाहरण नंबर ४: माझे स्वतःचे उत्पन्नातून टॅक्स भरून उरलेले रु.50 लाख बँक फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले आहे परंतु ते मी माझ्या पत्नी मुलगा मुलगी, आई वडील यांना गिफ्ट दिले तर त्यावरील येणारे व्याज कुणाच्या उत्पन्नात पकडले जाईल ?
    • उत्तर: येणारे व्याज हे जो गिफ्ट देतो त्याच्या उत्पन्नात पकडले जाईल. म्हणजेच बँकेत एफ डी कुणाच्या उत्पन्नातून केली याह महत्व आहे. तसेच अशी गिफ्ट हि देणाऱ्या साठी लाइफटाइम असेल व परत घेतली जाणार नसले(irrevocable) तर असे उत्पन्न हे ज्याला गिफ्ट दिली आहे त्याचे पकडले जाईल.
  • उदाहरण नंबर ५: माझी एक अल्पवयीन मुलगी (वय 18 वर्षां खालीची) आहे व तिला मी माझे उत्पन्नातून 10 लाख रु गिफ्ट दिले आणि तिने त्याची बँक मध्ये FD केली तर येणारे व्याज हे कुणाच्या उत्पन्नात पकडले जाईल ?
    • उत्तर: येणारे व्याज हे जो गिफ्ट देतो म्हणजेच वडिलांच्या उत्पन्नात पकडले जाईल.

निष्कर्ष: काय लक्षात ठेवावे? 🤔

वर दिलेल्या गोष्टी सर्व आयकर कारदात्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. विशेष करून एखाद्या प्रॉपर्टीचे उत्पन्न पती पत्नी, मुलगा, मुलगी यांचे उत्पन्न दखविताना त्याचा मालक कोण? प्रॉपर्टी इतर व्यक्तीला ट्रांसफर केली आहे किंवा नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

नाही तर स्वतःचे उत्पन्नचा आयकर स्लॅब हा कमी ठेवण्यासाठी चुकीच्या गोष्टी केल्या तर आयकर व्याज व पेनलटी सह भरावा लागेल. आणि आयकर खाते नेहमी हे बघत असते कि करदाता उच्च आयकर स्लॅब मध्ये कसा येईल.

📖🖋️ब्लॉग लेखन :
CA राम डावरे
मोबाईल नंबर : 9049786333

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *