रामायणातून आर्थिक शिकवण पान २

आर्थिक रामायण : योग्य सल्ला आणि नैतिकतेचे महत्त्व 🌟

पान क्रमांक ४ वरून

  1. सल्ल्याचे महत्व (Importance of Advice) 🗣️
    कैकयीने मंथराचा सल्ला घेतला आणि रामायण घडले. मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपला आर्थिक सल्लागार कोण आहे यावरती खूप काही अवलंबून असते. प्रत्येक आर्थिक गोष्टीची आपल्याला माहिती नसते. उत्पन्न, बचत, गुंतवणूक, महागाई, करनियोजन या सर्व गोष्टी आर्थिक बाबतीत आपल्याला माहिती असेलच असे नाही.
    • योग्य आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेतला तर आपले आर्थिक जीवन हे आनंदी जाणार आहे.
    • आज काल मार्केटमध्ये खूप सार्‍या फसव्या गुंतवणूक योजना आलेल्या आहे. अतिलोभापोटी लोक त्यात पैसे गुंतवतात व करोडो रुपये हे बरबाद होतात.
    • ह्या गुंतवणूक योजनांमध्ये पैसे टाकायचे की नाही याबद्दल जर तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेतला तर तुमचे पैसे वाचतील.
    • आज तुम्ही कुठलेही वर्तमानपत्र घ्या त्यात आर्थिक फसवणुकीची एक तरी बातमी हि असणारच. आर्थिक व्यवहार करताना योग्य माणसाचा सल्ला घेणे जरुरी आहे.
  2. मर्यादा पुरुषोत्तम व्यवसायात (Ethics in Business) ⚖️
    मित्रांनो रामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो आपल्या व्यवसायात सुद्धा आपल्याला काही मर्यादा पाळाययच्या असतात. अनैतिक मार्गाने पैसे न मिळवता नैतिक मार्गाने पैसे मिळवणे याला फार महत्त्व आहे. राम जरी 14 वर्षे वनवासात गेला असेल आणि बिकट परिस्थितीला सामोरा गेला असेल तरी रामाने कधीही नैतिकता आणि मर्यादा सोडली नाही.
    • आपल्या व्यवसायात सुद्धा आपण प्रचलित कर कायद्यांचे पालन करून योग्य असे उत्पन्न मिळवायचे आहे म्हणजे आपल्याला ईडी आणि सीबीआय यापासून धोका राहणार नाही.
    • आपल्या घरात येणारी संपत्ती हि वाजत गाजत आली पाहिजे ती टेबलाखाऊन आलेली नसावी. संत तुकाराम सुद्धा सांगतात जोडोनिया धन उत्तम व्यवहारे.
  3. अति लोभ नको (No Greed) 🚫
    मित्रांनो रामाने रावणाचा पराभव केला परंतु रावणाचे जे राज्य होते त्यावरती रामाने स्वतःचा दावा कधी केलेला नाही. रावणाचा पराभव केल्यानंतर ते बिभीषणाला राज्य देऊन टाकले आणि राम परत अयोध्येला परत गेले.
    • दुसऱ्याच्या संपत्तीमध्ये अति लोभ दाखवणे किंवा दुसऱ्याची संपत्ती लुटून आपली संपत्ती वाढवणे ही अनैतिकता आपल्या आर्थिक जीवनात कधीही असू नये. असे केले तर त्याचे दुष्परिणाम हे ठरलेले आहे.
    • आपले कर्म चांगले असले तर आपले आर्थिक जीवन आणि आपल्याला मिळालेली संपत्ती सुद्धा आपल्याला आयुष्यभर आनंद देत राहते.
    • आज रशिया युक्रेन, गाझा युद्ध, पाकिस्तान इराण संघर्ष हे दुसऱ्याच्या संपत्ती वर वर्चस्व मिळविण्यासाठी सुरु आहे व त्यातून लाखो निरपराध लोकांचे प्राण जात आहे . रामाच्या विचारांची गरज आज पूर्ण जगाला आहे .
  4. कौटुंबिक एकजूट (Family Unity) 👨‍👩‍👧‍👦
    रामायणामध्ये रामाचे जे सर्व भाऊ होते त्यांनी एकमेकाला जीवापाड साथ दिली. आज काही कौटुंबिक व्यवसायामध्ये घरामध्ये इतके भांडण असतात की व्यवसाय पूर्ण बुडण्याला कारणीभूत हे कौटुंबिक कलह होत जातात अगदी एकमेकांचे खून करण्यापर्यंत गोष्टी जातात.
    • अनेक जे काही कौटुंबिक बिजनेस आहे त्यामध्ये हल्ली एकमेकांच्या भांडणामुळे फार अडचणी निर्माण झाल्या आहे .रामायण ना मधून आपण हे शिकले पाहिजे की कितीही कौटुंबिक कलह असले तरी एकमेकांनी एकमेकांची साथ सोडता कामा नये .
    • विशेष करून जे वडिलोपार्जित व्यवसाय आहे ज्यामध्ये दोन किंवा तीन भाऊ एकत्र काम करतात त्यांच्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे.

📖🖋️ब्लॉग लेखन :
CA राम डावरे
मोबाईल नंबर : 9049786333

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *