व्यवसायातील ना नफा ,ना तोटा पॉईंट

⚖️ व्यवसायातील BEP म्हणजे काय ?

👉आपल्या सर्वांना व्यवसाय सुरू करतांना त्यात कधी प्रॉफिट होईल हे माहीत असणे गरजेचं असतं आणि त्यासाठी BEP हा विषय समजून घेणे फार महत्त्वाचा आहे .

👉काय आहे BEP ? 🤔

BEP म्हणजे तुमच्या व्यवसायातील विक्रीचा असा टप्पा या टप्प्यावर तुम्ही ना नफा ना तोटा ह्या जवळ असतात म्हणजे ह्या पॉइंटला तुमचा व्यवसाय तोट्यात पण नसतो आणि नफ्यात पण नसतो त्याला BEP असं म्हणतात. आपल्या प्रत्येकालाच व्यवसाय सुरू करून त्यातून नफा मिळवायचा असतो परंतु नवीन व्यवसाय सुरू करताना किंवा असलेल्या व्यवसायातून त्याचे खर्च जाऊन नक्की नफा कधी मिळेल हे माहीत असणे खूप खूप गरजेचे आहे नाहीतर आपण व्यवसाय सुरू ठेवतो आणि आपल्याला त्यातून नफा मिळत नाही आणि मग आपला वेळ वाया जातो त्यासाठी BEP माहित असणे हे फार महत्त्वाचा आहे

👉कसा काढायचा BEP ? ⚙️

BEP काढण्यासाठी आपल्याला तीन महत्त्वाच्या माहीत असणे गरजेचे आहे.

  1. पहिली बाब तुमच्या व्यवसायाचे स्थिर खर्च स्थिर खर्च ( fix expenses). हे असे खर्च असतात की तुमचे प्रोडक्शन किंवा तुमचा बिजनेस सुरू असो किंवा नसो ते खर्च तुम्हाला करावेच लागतात. यामध्ये तुमची व्यवसायाची जागा जर भाड्याने असेल तर त्या जागेचे भाडे, तुमच्या कर्मचाऱ्यांचा पगार, तुमच्या व्यवसाय वरती जर बँकेचे कर्ज असेल तर त्या कर्जाचे हप्ते व त्याचे व्याज तुमच्या कारचे इन्शुरन्स, प्लांट व मशिनरी इन्शुरन्स, बिल्डिंग इन्शुरन्स इत्यादी. असे अनेक खर्च असतात की तुमचा व्यवसाय सुरू असो किंवा बंद असो प्रॉडक्शन सुरू असो किंवा बंद असतो विक्री सुरू असो किंवा बंद असो हे करावेच लागतात. तर हे खर्च किती आहे हे माहीत असतं BEP काढण्यासाठी महत्त्वाचा आहे.
  2. दुसरा महत्त्वाचा खर्च माहीत असणे गरजेचे आहे ज्याला अस्थिर खर्च (Variable Expenses ) अस्थिर खर्च म्हणजे असे खर्च की जे तुमच्या प्रोडक्शन नुसार ते बदलत असतात जसे की तुमच्या प्रोडक्शन साठी लागणारा कच्चामाल, प्रोडक्शन साठी लागणारे लेबर, प्रोडक्शन साठी लागणारे विजेचे बिल, ट्रान्सपोर्ट खर्च इत्यादी असे खर्च आहे की जे प्रोडक्शन शी रिलेटेड असतात आणि ते प्रोडक्शन जर बंद असेल तर करावे लागत नाही. यात fixed expenses सोडून उरलेले खर्च आसतात.
  3. आणि तिसरा महत्त्वाचा भाग माहीत असणे गरजेचे आहे तुमच्या उत्पादनाची विक्री किंमत.

👉कसा काढायचा BEP ? 📝

BEP काढण्याचे एक सूत्र किंवा फॉर्म्युला आहे तो असा आहे .

BEP sales in unit = Total fix expenses ÷ ( sale price per unit – Variable expenses per unit )

याचा साधा अर्थ असा आहे की तुमच्या टोटल fix expenses ला तुमच्या मालाची प्रति युनिट किंमत आणि तुमच्या व्यवसायातील variable खर्च प्रति युनिट फरकाने भागायचे आहे आणि जे उत्तर यईल ते तुमचे BEP युनिट मध्ये येणार आहे .म्हणजे तेवढे युनिट ची विक्री झाली की तुमचा व्यवसाय हा ना नफा ना तोटा पॉईंट वर असतो .

👉एक उदाहरण घेऊन हे आपण समजून घेऊ .💡

राम ने नवीन व्यवसाय सुरू केला आहे आणि त्याच्या व्यवसायाचा अभ्यास करून खालील माहिती काढली आहे .

वर्षे भराचे एकूण fix expenses : रु . 5 लाख .
Variable खर्च प्रति नग : रु.25/-
विक्री किंमत प्रति नग : रु.140/

वरील सूत्रानुसार राम ला त्याच्या व्यवसायातील BEP हा 4348 नग ( युनिट ) हा येईल . म्हणजे मी रु 5 लाखाला रु.115 ( रु 140 वजा रु 25) ने भागले .

तर रामला ना नफा ना तोटा ह्या पॉईंट ला जायला 4348 नग विक्री करावे लागतील आणि त्या नंतर च्या विकी वर त्याला त्याचा नफा सुरू होणार आहे .

वरील सूत्राकडे तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर कोणत्याही तीन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला चौथी गोष्ट मिळू शकते . फिक्स खर्च, बदलणारे खर्च हे तर तुमच्याकडे आसतात पण तुम्ही अंदाजे विक्री नग टाकले तर तुमच्या उत्पादनाची विक्री किंमत सुद्धा काढू शकता .

👉BEP काढण्याचे फायदे : ✅

  • व्यवसायातील तुमचा नफा कधी सुरू होईल हे समजते.
  • किती नग उत्पादन वा विक्री करायचे हे कळते
  • खेळते भांडवल नियोजन करता येते तुमच्या उत्पादनाची विक्री किंमत काय ठेवायची याचा अंदाज येतो.
  • उत्पादन capacity किती वापरली जावी किती शिल्लक राहते याचा अंदाज येतो.

😊तर उद्योजक मित्रांनो BEP काढणे हा विषय फार महत्वाचा आहे आपण सर्वांनी यावर विचार करून काम केले पाहिजे .

📖🖋️ब्लॉग लेखन :
CA राम डावरे
मोबाईल नंबर : 9049786333

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *