सिबिल स्कोअर आणि तुमची पत

सिबिल स्कोअर आणि तुमची पत: आर्थिक भविष्याची गुरुकिल्ली 🔑

अजय हा नुकताच बारावी पास झाला होता आणि त्याला परदेशामध्ये शिकण्यासाठी जायचे होते. तो आणि त्याचे पालक हे बँकेकडे एज्युकेशन लोन साठी अर्ज करत होते. अजय पण बँकेमध्ये त्यांच्या पालकासोबत जायचा आणि चर्चा करताना सिबिल स्कोअर हा विषय आला. अजयला हा प्रकार काही माहिती नव्हता परंतु त्याच्या आई-वडिलांच्या सिबिल स्कोअर हा फारच कमी आहे म्हणून त्याला पाहिजे तेवढे एज्युकेशन लोन मिळत नव्हते. ही गोष्ट फक्त अजयची नाही तर ती आपल्या सर्वांची आहे आणि सिबिल स्कोअर आणि बँकेची पत हा फार महत्त्वाचा विषय आहे. बरेच लोक सिबिल स्कोअर कडे लक्ष देत नाही परंतु आता सिबिल स्कोअर ला इतके महत्त्व आले आहे की चांगल्या सिबिल स्कोअर ला कर्जाला व्याजदर कमी आणि खराब सिबिल स्कोअर ला व्याजदर जास्त द्यावा लागतो . पूर्वी लोक अनेक बँकेकडून कर्ज घेत असत व एकाचे कर्ज घेतले हे जरी वेळेत भरले नाही तरी दुसऱ्या बँकेकडून लपवून ठेवत असत . असा बाबतित कर्जदाराचे उत्पन्न तेवढेच असायचे आणि अनेक कर्ज घेतल्यामुळे ते वेळेवर परतफेड न झाल्याने सर्वच कर्ज हे थकत असे. म्हणून सर्व कर्ज एक ठिकाणी दिसावे ह्या उद्देशाने सिबिल हि संस्था सुरु झाली .

सिबिल संस्थेबद्दल थोडक्यात माहिती 🏦

सिबिल ही संस्था ऑगस्ट 2000 मध्ये मुंबईमध्ये स्थापन झालेली आहे. ही संस्था सुरुवातीला क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड या नावाने ओळखली जायची. त्यानंतर ट्रान्स युनियन ह्या कंपनीने ह्या संस्थेचे काही शेअर्स विकत घेतले आणि म्हणून आता ती ट्रान्स युनियन सिबिल या नावाने ओळखली जाते. ही संस्था कुठलीही सरकारी संस्था जरी नसली तरी त्या संस्थेने आजपर्यंत जी नीतिमत्ता बाळगलेली आहे व त्यातून जो नावलौकिक मिळवला आहे त्यामुळे सर्वच बँका आता सिबिल स्कोअर ह्या कंपनीच्या वेबसाईट वरती जाऊन बघतात. ह्या कंपनीची वेबसाईट www.cibil.com हि आहे.

भारतातील जवळजवळ सर्वच बँका मग त्या सरकारी असो किंवा खाजगी बँक असो त्या ह्या संस्थेच्या सभासद आहे आणि त्यांना आपल्या कर्जदाराची माहिती ह्या वेबसाईटवर वेळोवेळी टाकणे बंधनकारक आहे. क्रेडिट इन्फर्मेशन रेग्युलेशन ऍक्ट 2005 नुसार भारतीय रिजर्व बँकेने सर्व बँका आणि इतर फायनान्सियल संस्था याना ह्या वेबसाईटवर माहिती टाकणे बंधनकारक केले आहे .

ह्या वेबसाईट वरती वैयक्तिक माणसाला त्याचा सिबिल स्कोर हा फ्री मध्ये बघावयास मिळतो त्यासाठी ह्या वेबसाईट वरती जाऊन तुमचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून इथे तुमचे अकाउंट तयार करावे लागते वैयक्तिक व्यक्ती सोडून इतरांसाठी ह्या वेबसाईटवर काही चार्जेस भरून स्कोअर बघायला मिळतो. वैयक्तिक माणसाला सुद्धा डिटेल मध्ये सिबिल स्कोअर रिपोर्ट हवा असेल तर त्यासाठी सुद्धा काही चार्जेस आहे.

किती असावा सिबिल स्कोअर? 🤔

क्रेडिट स्कोअर हा 300 ते 900 दरम्यान निर्धारित केला जातो. जर तुमचा क्रेडिट स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो उत्तम मानला जातो. 550 ते 750 मधील स्कोअर चांगला मानला जातो आणि 300 ते 550 मधील स्कोअर खराब मानला जातो. तुमच्या सिबिल स्कोअर हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो .

सिबिल स्कोर चा 30% अहवाल हा तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करत आहात की नाही यावर अवलंबून असतो, तसेच 25% तुम्ही घेतलेले कर्ज सुरक्षित (तारणी) किंवा असुरक्षित (विना तारणी) ह्यावर ठरतो. 25 % हे तुमचे क्रेडिट एक्सपोजर कसे आहे यावर तर 20% कर्जाच्या वापरावर अवलंबून असतो . म्हणजेच तुमचा क्रेडिट स्कोअर काढताना वरील सर्व मुद्दे त्या त्या प्रमाणात किंवा टक्केवारीत विचारात घेतली जातात.

सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी? 📝

सिबिल स्कोअर चांगला तेथे ठेवायचा असेल तरी खालील काळजी घेणे गरजेचे आहे:

  1. कर्जाचे हप्ते वेळेवर भरा 🗓️:
    जर तुम्ही बँकेकडून किंवा कुठल्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले असेल तर ते वेळेवर भरा . कुठल्याही बँकेकडून किंवा फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले असेल तर त्याची नोंद ही सिबिल कडे करावी संबंधित बँकेला लागते आणि अशी नोंद करताना ते कर्ज रेगुलर आहे की थकीत आहे याची सुद्धा नोंद केली जाते त्यामुळे तुम्ही कुठल्या कुठल्या बँकेकडून कर्ज घेतलेले आहे त्या सर्वांचे हप्ते वेळेवर भरा कारण सर्वांचे रेकॉर्ड हे सिबिल कडे जात असते. कर्जाचा एक जरी हफ्ता थकला तरीही त्याची नोंद सिबिल कडे होत असते.
  2. क्रेडिट कार्डची मर्यादा वारंवार वाढवू नका 💳:
    तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याची मर्यादा पुन्हा पुन्हा वाढू नका. कर्ज मर्यादा वाढवणे हा तुमचा खर्च अवास्तव असल्याचा पुरावा आहे अशा परिस्थितीत तुम्ही क्रेडिट कार्ड मधून जितकी रक्कम खर्च करता त्याचे बिल तुम्हालाच भरावे लागेल . जर बिल जास्त असेल तर वेळेवर पेमेंट करण्यास अडचणी येतात आणि त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो. बरेच क्रेडिट कार्ड होल्डर मिनिमम बॅलन्स दर महिन्याला भरतात परंतु उरलेलंही रक्कम हि सिबिल मध्ये थकीत म्हणून दिसत असते ज्याने क्रेडिट स्कोअर कमी होतो.
  3. एकाच वेळी अनेक कर्ज घेऊ नका 🚫:
    जर तुम्हाला चांगला क्रेडिट स्कोअर राखायचा असेल तर तुम्ही एकाच वेळी अनेक कर्ज घेणे टाळायला हवे कारण अशा परिस्थितीत तुमच्यावरील EMI चा भार वाढतो कधी कधी EMI चुकू शकतो तसेच कुठल्यातरी एकाच बँकेसोबत तुम्ही सर्व व्यवहार करत रहा अनेक बँकेसोबत कर्ज व्यवहार करत राहिले तर एकाही बँकेचे कर्ज भरले जात नाही आणि मग कर्ज थकीत होतात .
  4. जामीनदार होण्यापूर्वी विचार करा 🤔:
    माझा जवळचा मित्र आहे जवळचा नातेवाईक आहे त्याला कसे नाही म्हणूं . एखाद्याला कर्जाचे जामीनदार होण्याआधी काळजीपूर्वक विचार करा . आता तर तुम्ही ज्याला जामीनदार आहे त्याने कर्ज वेळेवर भरले नाही किंवा थकवले तर तुमचा पण सिबिल स्कोअर कमी होतो व तुमच्या सिबिल रिपोर्ट मध्ये सुद्धा तुम्ही ज्याला जमीनदार आहे त्याचे कर्ज दिसतात. त्यामुळे कुणालाही जामीनदार होतानी भरपूर विचार करावा एखाद्याला नाही म्हटले तर थोडा वेळ राग येतो परंतु जर त्याच्याकडून कर्जाचे हप्ते भरले गेले नाही तर त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअर वर होतो आणि तुम्हाला कर्ज घेते वेळेस अडचण येते.
  5. एकाच वेळी अनेक बँकांकडे अर्ज नको 🏦:
    एकाच वेळी अनेक बँकेसाठी अर्ज करू नका कारण सिबिल वेबसाईटवर तुम्ही कुठल्या कुठल्या बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला आहे याची नोंद सुद्धा होत असते आणि तुम्ही खूप साऱ्या बँकांकडे लोन साठी अर्ज करत असाल तर तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमचे लोन जास्त आहे व तुम्हाला इतर बँका का लोन देत नाही याचा विचार दुसऱ्या बँका करता.
  6. विनातारणी कर्ज टाळा 🔒:
    वर आपण बघितलेच कि तुमचा 25 % स्कोअर हा तुमचे कर्ज तारणी आहे कि विना तारणी आहे यावर ठरतो . वैयक्तिक लोन (पर्सनल लोन) किंवा क्रेडिट कार्ड वर खर्च अशासारखे विना तारनि लोन असतील तर त्याचा क्रेडिट स्कोर वर दुष्परिणाम होतो. कर्ज देणाऱ्या कंपनीला यातून असे पण आढळते की तुम्हाला तुमचे आर्थिक व्यवस्थापन करता येत नाही.

कमी सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी उपाय 🛠️

कमी क्रेडिट स्कोअर झाला असेल तर तो खालील पध्दतीने वाढवता येईल:

  1. सेटलमेंट टाळा 🙅‍♂️:
    शक्यतो तुम्ही घेतलेले कोणतेही लोन सेटल करून भरू नका, व्याजात सूट घेऊ नका अनेक लोक कर्ज थकले ती त्याची सेटलमेंट करून कमी करून भरतात. असे केले तरी तुम्हाला बँक कर्ज भरले याचा दाखल देते परंतु सिबिल मध्ये सेटलमेंट हा रिमार्क आला तर तुमचा स्कोअर कमी होतो व इतर बँक सुद्धा कर्ज देताना विचार करणार.
  2. सेटलमेंट रिमार्क हटवा ✍️:
    तुम्ही एखादे कर्ज सेटलमेंट करून भरले असेल किंवा व्याजात सूट घेतली असेल तर उरलेली रक्कम भरून पुन्हा बँकेकडून सिबिल मधील सेटलमेंट हा रिमार्क काढण्यासाठी इ मेल करण्यास सांगावा. लक्षात गया कि पूर्ण रक्कम भरल्याशिवाय सिबिल मधील खराब रिमार्क निघत नाही .
  3. शॉर्टकट नाही 🛤️:
    खराब असलेला सिबिल स्कोअर वाढविण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही . सिबिल मध्ये कर्जसमोर जो रिमार्क असतो त्यानुसार त्याची कर्ज परतफेड कशी झाली आहे किंवा कर्ज सुरु असेल तर कशी होत आहे हे समजते . सेटलमेंट, ओहर डू असे रिमार्क काढून तुम्हाला कमी झालेला सिबिल स्कोअर वाढवता येतो . परंतु त्यासाठी संबंधित बँकेने सिबिल संस्थेला कळविले पाहिजे . किंवा कर्जदार सुद्धा सेटल झालेली किंवा ओव्हर डू असलेली रक्कम भरून व तसे पत्र घेऊन सिबिल संस्थेला कळवू शकतो . त्यासाठी वेबसाईटवर स्वतंत्र पद्धत उपलब्ध आहे . कर्जदाराने कळविल्या नंतर त्या बँक किंवा फायनान्सियल संस्थेकडे सिबिल संपर्क करते व त्यांनी कर्जदाराने सादर केलेली एन वो सी योग्य असेल तरच निगेटिव्ह रिमार्क काढून सिबिल स्कोअर वाढला जातो.
  4. वेळेवर माहिती द्या ℹ️:
    कधी कधी कर्जदार फार प्रामाणिक असतो परंतु काही टाळता न येणाऱ्या गोष्टींमुळे जसे कि अपघात , आजारपण , नोकरी जाणे ह्यामुळे कर्ज हफ्ते वेळेत हरले जात नाही परंतु ह्यातून बाहेर आल्यानंतर दंड व्याजासहित भरणा करून तसे सिबिल ला कळवावे म्हणजे सिबिल स्कोअर वाढला जातो .
  5. तक्रार निवारण खिडकी 🚪:
    वर दिलेल्या सिबिल वेबसाईटवर कर्जदाराची स्वतंत्र्य तक्रार निवारण खिडकी उपलब्ध आहे . कर्जदाराने सिबिल चार्जेस भरून डिटेल अकाउंटवाईझ सिबिल रिपोर्ट काढावा व प्रत्येक कर्ज त्यात कसे दिसत आहे ते तपासावे . कधी कधी चुकून बँकेकडून कर्ज रेगुलर भरत असेल तरी थकीत टाकले जाते त्यासाठी बँकेला त्यात सुधारणा करण्यास सांगावी .
  6. कर्ज करार वाचा 📜:
    प्रत्येकाने कर्ज घेताना / घेत्तल्यानंतर कर्ज करारनामा व्यव्सस्थित वाचावा . त्यात व्याजदर , दंड व्याज , लोन हफ्ता तारीख , कर्जाची पूर्णपणे एकरकमी परतफेड करायची असेल तर त्याचे चार्जेस किती आहे याची सखोल माहिती करून घ्यावी . नंतर कर्ज जरी भरले गेले तरीही वेवेवेगळे चार्जेस तसेच सिबिल मध्ये येणे दिसतात व त्यामुळे सिबिल स्कोअर कमी होतो.
  7. कार्ड हरवल्यास तक्रार करा 🚨:
    कधी कधी तुमचे क्रेडिट कार्ड हरवले असेल व त्यावर काही फ्राऊड झाला असेल तर ताबडतोप तुम्ही बँकेला कळवा किंवा तक्रार करा क्रेडिट कार्ड ब्लॉक करायला सांगा . तसे केले नाही तर त्याची रक्कम तुम्हाला भरावी लागेल व त्यात विलंब झाला तर क्रेडिट स्कोअर कमी होतो.

तर अश्या प्रकारे तुमचा सिबिल स्कोअर किती महत्वाचा आहे हे तुम्हाला समजले असेलच . त्यावर कायम नजर ठेवावी म्हणजे तो उत्तम राहील .

ब्लॉग लेखन : सी ए राम डावरे , मोबाईल : ९०४९७८६३३३.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *