
व्यवसायात मर्यादा पुरुषोत्तम राम! 🏹 आर्थिक नियोजनाचे रामायण! 💰
मित्रांनो रामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. आपल्या व्यवसायात सुद्धा आपल्याला काही मर्यादा पाळायच्या असतात. अनैतिक मार्गाने पैसे न मिळवता नैतिक मार्गाने पैसे मिळवणे याला फार महत्त्व आहे. राम जरी 14 वर्षे वनवासात गेला असेल आणि बिकट परिस्थितीला सामोरा गेला असेल तरी रामाने कधीही नैतिकता आणि मर्यादा सोडली नाही. आपल्या व्यवसायात सुद्धा आपण प्रचलित कर कायद्यांचे पालन करून योग्य असे उत्पन्न मिळवायचे आहे म्हणजे आपल्याला ईडी आणि सीबीआय यापासून धोका राहणार नाही. आपल्या घरात येणारी संपत्ती हि वाजत गाजत आली पाहिजे ती टेबलाखाऊन आलेली नसावी.
आपले जे महान धर्मग्रंथ आहे हे धर्मग्रंथ कायमच आपल्याला काहीतरी उपदेश करत असतात. नुकतेच आयोध्या येथे आपण भव्य असे रॅम मंदिर बांधले आणि राम लल्ला ची स्थापना झाली आणि सर्व भारतीयांनी मोठा जल्लोष करून त्याचे स्वागत केले. रामायणापासून आपण खूप काही शिकतो आर्थिक विषयात सुद्धा रामायण आपल्याला खूप काही शिकवते त्याचा थोडक्यात परामर्श आपण घेऊ:
1. आरोग्य संजीवनी! 💪
रामायणामध्ये एक प्रसंग आहे लक्ष्मण हा मूर्च्छित झालेला असतो आणि त्याला वाचवण्यासाठी संजीवनी बुटी आणण्याचे सांगण्यात येते आणि हे काम हनुमानाला दिले जाते आणि तो संजीवनी बुटी घेऊन येतो आणि लक्ष्मणाचे प्राण वाचतात.
मित्रांनो हे रामायणामध्ये होतं परंतु आज-काल आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी स्वतःलाच घ्यायची आहे. त्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम योगा, मेडिटेशन हे करायचे आहे कारण आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतली नाही तर ती दुसरी कोणीही घेणार नाही आणि आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये खूप खर्च होत असतो त्यासाठी आपण आपला मेडिक्लेम सुद्धा घेण्याची गरज आहे.
आपल्याला दुसरा ह्या कलियुगात कुठलाही हनुमान येऊन मदत करणार नाही तर आपण आपल्या आरोग्याची आणि काळजी स्वतःलाच घ्यायची आहे. राकेश झुनझुनवाला याने शेअर मार्केट मध्ये करोडो रुपये संपत्ती कमावली परंतु आरोग्य कडे लक्ष न दिल्याने त्याला हे जग लवकर सोडून जावे लागले. आपण कमावलेल्या संपत्तीचा उपभोग घेणेसाठी चांगले आरोग्य ठेवणे हे आपल्याच हातात असते.
2. खर्चाला लक्ष्मण रेषा! 🙅♂️
लक्ष्मण रेखा हा शब्द आपल्याला रामायणा मधून मिळालेला आहे याचा अर्थ कुठले तरी आपल्याला लिमिट ठरवून घ्यायचे असते. आर्थिक बाबतीत सुद्धा खर्च करताना आपल्याला खर्च हा आपल्या बजेटमध्ये किंवा लिमिटमध्ये करायचा आहे. आपल्या उत्पन्नातून खर्च वजा जाता आपण किती शिल्लक बाजूला ठेवतो याच्यावरती आपण किती लवकर अर्थ संपन्न होणार आहे हे ठरणार असते.
आर्थिक अर्थसंप्पन व्हायचे असेल तर एक नियम आहे की तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमच्या खर्च करण्याच्या सवयी ह्याच तुम्हाला श्रीमंत बनवत असतात. त्यामुळे मॉलमध्ये गेल्यानंतर किंवा डिस्काउंट च्या नावाखाली भरमसाठ खरेदी करून आपला खर्च वाढवण्यात काही अर्थ नाही. आपल्या खर्चाला कुठेतरी लक्ष्मण रेखा असणे गरजेचे आहे आणि आपल्या खर्चाचे वर्षाचे, महिन्याचे बजेट तयार केले गेले पाहिजे आणि त्याला कुठे तरी लक्षण रेखा असणे गरजेचे आहे. आज लोकांशी तुलना करून आपण अनेक अनावश्यक खर्च फक्त दिखाऊ पनासाठी करत असतो.
3. आपत्कालीन निधी (Emergency Fund) 🚨
मित्रांनो दशरथ राजाने रामाला राज्य गादीवर बसवण्याचे ठरवले होते परंतु अशी काही कौटुंबिक परिस्थिती आली की रामाला 14 वर्षे वनासात जावे लागले. मित्रांनो आपल्या आयुष्यात कधीतरी अशी आपत्कालीन परिस्थिती येत असते त्यासाठी आपल्याला नेहमी तयार असायला पाहिजे.
आर्थिक बाबतीत आपण नेहमी काही आपत्कालीन निधी बाजूला काढून ठेवला पाहिजे. जसे की काही मोठे आजारपण किंवा अचानक अशी काही आर्थिक परिस्थिती उद्भवली तर तो निधी आपल्याला वापरता येतो. नेहमी आपत्कालीन परिस्थिती काहीही उद्भवू शकते त्यासाठी स्वतःला तयार ठेवणे व त्यासाठी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळेस मुलांचे शिक्षण, घरातील वृद्ध आई वडील याचे आजारपण यासाठी आपण योग्य आर्थिक नियोजन करत नाही.
4. संयम आणि नेटवर्क! 🤝
मित्रांनो रामाला 14 वर्षे वनवास झाला परंतु त्या वनवासामध्ये रामाने अतिशय दीर्घ नियोजन करून स्वतःचे नेटवर्क उभे करून वानर सेना तयार केली. अतिशय कठीण परिस्थिती सुद्धा तुम्ही संयम ठेवून इतरांशी चांगले वागून तुमचे नेटवर्क वाढवत जाऊन तुम्हाला यश प्राप्त होत असते.
रामाची 14 वर्षे वनवासाची जरी फार कठीण होती परंतु रामाने अतिशय संयमाने ती परिस्थिती हाताळली आणि अनेक लोकांचे नेटवर्क उभे करून शेवटी रावणाचा पराभव केला. आपल्याला सुद्धा आपला आयुष्यात आर्थिक अडचणी येत असतात परंतु त्यावरती संयमाने मात करणे आपल्या आजूबाजूच्या लोकांचे नेटवर्क उभे करणे त्यात जीवाला जीव देणारे हनुमान आणि सुग्रीव जोडणे हे महत्त्वाचे असते. आर्थिक अडचणी आल्यावर अनेक उद्योजक किंवा शेतकरी आत्महत्या करतात. रामाकडून संयम शिकणे गरजेचे आहे. आर्थिक परिस्थिस्ती कितीही बिकट झाली तर संयमाने त्यावर मत करता येते हे रामाने आपल्याला दाखून दिले आहे.
(पान क्रमांक ५ वर)
📖🖋️ब्लॉग लेखन :
CA राम डावरे
मोबाईल नंबर : 9049786333
