
तुमच्या मुलांची आर्थिक साक्षरता
अजय जरा थोडा आर्थिक अडचणीतच होता त्याने नुकतच एक नवीन घर घेतलं होतं आणि एक कार पण घेतली होती आणि त्याच्या पगारातून घर आणि कारचे हप्ते हे दर महिन्याला खूप सार्या प्रमाणात जात होते आणि फार कमी पैसे त्याला कुटूंबासाठी उरत होते. दुर्दैवाने त्याचा नुकताच एक एक्सीडेंट झाला आणि त्याला बऱ्यापैकी मार लागला आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्याचा खूप सारा खर्च होणार होता. सुदैवाने ज्या कंपनीमध्ये तो कामाला होता तिथे कंपनीने त्याची मेडिकलेम पॉलिसी काढलेली होती आणि त्या पॉलिसी अंतर्गत त्याचा होणारा उपचाराचा सर्व खर्च त्या पॉलिसीमध्ये कव्हर झाला होता.
त्याची एक मुलगी नुकतीच बारावीला होती आणि तिला पण शिक्षणासाठी खूप खर्च लागणार होता. घरातीला धावपळ व आर्थिक ओढातान तिला माहीत होती वडिलांचा एक्सीडेंट झाल्यानंतर आता खूप सारे पैसे लागतील म्हणून ती खूप टेन्शनमध्ये होती. पण तू जेव्हा तिच्या आईने सांगितलं की बाळा हा सर्व खर्च आपण मेडिक्लेम मधून करणार आहोत आपल्याला एक पैसा सुद्धा खर्च करावा लागणार नाही त्यावेळेस तिला आश्चर्य वाटले आणि मग तिने हे मेडिक्लेम काय प्रकार आहे याची माहिती घ्यायला सुरुवात केली तोपर्यंत तिला ह्याबाद्दल काहीही माहिती नव्हते. थोडक्यात तो अर्थनिरक्षर होती.
तुम्हाला आश्चर्य वाटेल कि भारतातील फक्त ३५ % नागरिक हे अर्थसाक्षर आहे. मुलं अर्थसाक्षर आसने हि तर फार दूरची गोष्ट. एखाद्या दीड वर्षाच्या मुलाला कागदाचा तुकडा दिला तर तो त्याकडे पाहत सुद्धा नाही आणि हातात सुद्धा घेत सुद्धा परंतु त्याला दहा रुपयाची नोट दिली तर तो किंवा ती त्याचा हातातून परत देत सुद्धा नाही. सबसे बडा रुपया हे त्या लहान मुलाला समजते पण अर्थसाक्षरते बद्दल काय. अर्थात हे एक पैसे प्राणप्रिय असल्याचे एक उदाहरण मी दिले. मूल थोडी मोठी झाली तर त्यांना अर्थसाक्षर करणे हे काम पालकांनाच करावे लागेल.
सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आर्थिक सबल आणि साक्षर असणे गरजेचे आहे या सोबतच आपल्या मुलांना देखील योग्य वयात आल्यानंतर आर्थिक साक्षर बनवता आले तर फार चांगले. आपण सर्व पालक मुलांना पॉकेट मनी म्हणजे महिन्याचा खर्च देताना पाहिला असेलच हे सर्व सुरू असताना आता शिक्षण पद्धतीमध्ये देखील खरच बदल होणं आपल्याकडे गरजेचे झाला आहे. बाहेरच्या देशामध्ये 15 वर्षाच्या मुलांना आर्थिक साक्षरते बाबत शालेय विषय आणि परीक्षा देखील आहे 20०२२ मध्ये अमेरिकेमध्ये एक सर्वे करण्यात आला होता या सर्वे मध्ये असं सांगण्यात आलं होतं की अमेरिकेतील पाच पैकी फक्त एकाच मुलाला आर्थिक साक्षरतेची कमतरता आहे.
भारतात हे प्रमाण खूप कमी आहे किंबहुना भारतात आर्थिक साक्षरता असा लहान मुलांच्या बाबतीत काही प्रकारच नाही. असे चित्र आहे आपल्या पाल्यांना आर्थिक साक्षर बनवण्यासाठी आपल्याकडे कोणतेही फायनानशीची डिग्री अथवा काही विशेष ज्ञान असणे गरजेचे नाही काही मूलभूत आर्थिक गोष्टींचे नियम आपण पाल्यांना शिकवल्यास मुलं हे सर्व ज्ञान आरामशीरपणे समजू शकतात. मुलांचा पहिला पॉकेट मनी किती असावा आपल्या घरातील पैशाचे बजेट बघता मुलांनाही त्या प्रमाणातच पैसे द्यायला हवे. आपली परिस्थिती एक आणि आपल्या मुलांना पैसे देतो अनेक अस व्हायला नको. मुलांना पैशाच्या बाबतीत काही अनुभव देण्यास सुरुवात करायला हवी तर त्यांच्यात आर्थिक साक्षरता आणायची असेल तर तशी शिकवणही द्यावी लागेल.
मुलांना आर्थिक साक्षर बनवण्यासाठी काही टिप्स
- मुलांना ज्यावेळी पहिल्यांदा आपण पॉकेट मनी खर्च करण्यासाठी देतो तो अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो यामधून त्यांच्यात परिपक्वता वाढते आणि पालकांचा देखील त्यांच्यावर विश्वास बसण्यास मदत होते. जेव्हा आपण मुलांना पैसे देतो तेव्हा ते एखादी आनंदायी वस्तू मेजवानी किंवा इतर काही गोष्टींसाठी पुरतील इतके असायला हवेत.
- पैशाची बचत करायला शिकवा जर आपण पाच किंवा दहा वर्षांपूर्वीचा काळ आठवल्यास आपल्याकडे लहान मुलं छोट्या लाकडी गल्ल्यांमध्ये पैसे साठवायचे एखादा नातेवाईकाने किंवा घरच्यांनी पैसे दिल्यावर मुलं गल्ल्यामध्ये पैसे टाकून बचत करायचे सध्या पिगी बँक किंवा काही ऑनलाईन ॲप्सचा देखील मुलं वापर करतात.
- जपान मधील बँकांनी लहान मुलांना समजण्यासाठी बँकिंग सुविधांमध्ये खूप चांगले बदल केले आहे आपल्याकडे असे काही अस्तित्वात नसेल तरी देखील आपण पिगी बँक किंवा ऑनलाईन काही ॲपच्या माध्यमातून मुलांना बचत करायला शिकवू शकतो यातून आपल्या मुलांच्या व्यवहारांवर देखील लक्ष ठेवू शकतो.
- मुलांना पैशाची बचत करायची आणि पैसे योग्य ठिकाणी खर्च करायची सवय यामुळे लागते आपल्या आवडीनिवडी मुलांवर थोपवू नका, जर समजा मला लहानपणी खेळण्यात कार आवडायची तर माझ्या मुलाला कार आवडेलच असे नाही त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे काहीहि आवडू शकतो. त्याने कोणती खेळणी घ्यावी किंवा काय करावे याबाबत मी माझे मत लागू शकत नाही. योग्य गोष्टीची समज मी त्याला देऊ शकतो.
- छोटे छोटे निर्णय घेण्यास मुलांना मोकळीक द्या मुलांना छोटे निर्णय त्यांच्या पद्धतीने घेऊ द्या त्यांना दैनंदिन जीवनातील उदाहरण द्या आणि त्यांना व्यवहार नीट शिकवा एक उदाहरण द्यायचे झाल्यास आपण फळांच्या खरेदीचे उदाहरण घेऊ शकतो एखादी गोष्ट किती प्रमाणात आणायची, तिच्या दर्जा कसा हवा किंमत किती हवी या गोष्टीमुळे फळे खरेदी करण्याच्या उदाहरणातून मूळ शिकू शकतात.
- जसजसं मुलं मोठी होतील तसं तसं त्यांना आर्थिक तुलना करायला जमेल छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टींमधून आपण मुलांना चांगल्या चांगल्या व्यवहार त्याची पारख करणे शिकू शकतो. त्यांच्या ऐच्छिक भावनांवर काही गोष्टी झाल्यास निश्चित त्याच्यात निर्णय घेण्याची क्षमता वाढते अशाप्रकारे उद्याचे नागरिक असणाऱ्या आजच्या लहान मुलांना आर्थिक साक्षरता शिकवणे फार महत्त्वाचे आहे.
पालकांनी करावयाच्या गोष्टी
यासंदर्भात पालकांनी खालील गोष्टी केल्या तर मूल नक्कीच अर्थसाक्षर होतील. इथे मी अगदीच लहान मुलांबद्दल सांगत नाही. साधारणपणे मुलांना कळू लागण्याचे वय हे पाचवी पासून सुरु होते तर त्याचे लग्न होऊपर्यंत चा काळ हा अर्थ साक्षरतेसाठी फार महत्वाचा आहे. खालील काही गोष्टी पालकांनी केल्या तर मुलं सुद्धा अर्थसाक्षर होतील:
- सोशल मीडिया च्या तुलनात्मक जाळ्यात मुलांना अडकवू देऊ नका: आजकाल आपली सर्वांची मुले हि फेसबुक, इंस्टाग्राम व इतर सोशल मीडियावर सक्रिय आहे अगदी आठवी नववी चे मुलं सुद्धा सोशल मीडिया वापरतात. त्यातील चंगळवादाच्या जाहिरातीला ते नक्की बळी पडतात. त्यांच्या मित्रांनी काही गोष्टी खरेदी केल्या तर ते सोशल मीडियावर टाकले कि इतर मुलांनासुद्धा आपल्याकडे ती वस्तू नाही याची तुलना सुरु होते. मुलांना पालकांची आर्थिक परिस्थिती तुमचे उत्पन्न व खर्च याची योग्य समज देणे गरजेचे आहे.
- पालकांचे आर्थिक निर्णय घेताना मुलांसोबत पण चर्चा करा: भारतात शक्यतो मुलांना पालकाच्या आर्थिक निर्णयात सहभागी करून घेतले जात नाही. उलट पालकांना आर्थिक विषयांबाबत काही चर्चा कार्याची असेल तर मुलांना बाजूला जायला सांगितले जाते. हे अत्यंत चुकीचे आहे. त्यांना निर्णयात सामील करून घ्या. तुमचे महिन्याचे उत्प्प्न किती व खर्च किती याची योग्य कल्पना पालकांना द्या.
- मुलांना बचतीची सवय लावा: मुलांचे बचत खाते बँक मध्ये उघडा त्यांना बँकेत जायची सवय लावा. माझ्याकडे अनेक अशी उदाहरणे आहेत कि बी कॉम झालेली मुले बँकेत जाऊन कुणाला न विचारता बँक अकाउंट ओपन करण्याचा फॉर्म स्वतःहा भरू शकत नाही. चेकबुक, डिपॉझिट स्लिप, डिमांड दराफ्ट, आर ती जी एस, नॉमिनी ह्या सर्व कंसेप्ट मुलांना समजावून सांगा.
- गुंतवणूक आणि बचत यातील फरक समजून सांगा
- गरजा व चैनीच्या वस्तू यातील फरक मुलांना समजावून सांगा म्हणजे प्रत्येक खरेदी केली जाणारी वस्तू गरज आहे कि चैनीची वस्तू आहे हे बघण्याची सवय त्याना लागेल.
- घरात आणलेल्या वस्तूवरील किमतीचे स्टिकर, प्रॉडक्ट चे एक्सपायरी तारीख, उत्पादन कंपनी ह्याबद्दल मुलांसोबत पालकांनी सामूहिक चर्चा करा. यातून मुलांना त्याबद्दल माहिती होईल. काही दिवसानंतर घरात लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू आणायची जबाबदारी मुलांवर टाका.
- आयुर्विमा, मेडिकलेम यातील फरक मुलांना समजावून सांगा. त्याची गरज काय हे सुद्धा समजावून सांगा. विमा पॉलिसी मुलांना वाचायला लावा त्यातील माहिती, अटी शर्ती मुलांना समजावून सांगा.
- स्थावर मालमत्तेबाबत सुद्धा मुलांना अवगत करा. मालमत्ताचे चे खर्च जसे कि लाईट बिल, महापालिका कर किंवा इतर कर याबाबद्दल माहिती द्या ते भरले नाही तर त्याचे काय परिणाम होतील याची सुद्धा माहिती द्या. लाईट बिल, कर पावती मुलांना वाचायला लावा त्यांना त्यातील माहिती समजावून सांगा.
- चिट डे सोबत अर्थसाक्षर डे पण करा कि: डायट जे लोक करतात त्यांना एक दिवस चिट डे पण करण्याची मुभा असते. म्हणजे त्यादिवशी ते काही पण खाऊ शकतात. जसा चिट डे तुम्ही करतात तासा हफ्त्यातून एक दिवस मुलाच्या अर्थसाक्षारतेवर पण घालवा फार काही नाही हफ्त्यातून एक दिवस एक तास दिला तरी खूप झाले.
थोडक्यात मुलांची आर्थिक साक्षरता हि पालकांचीच खरी जबाबदारी आहे. उगाचच तो किंवा ती अजून लहान आहे मोठी झाली कि समजेल आपोआप ह्या भ्रमात राहू नका. पोस्टच्या पाकिटावर रिव्हेनु स्टॅम्प लावणारे खूप जण आहे भारतात त्यात तुमचा मुलगा किंवा मुलगी असू नये असे वाटत असेल तर त्यांना योग्य अर्थ साक्षर करा.
ब्लॉग लेखन : सी ए राम डावरे
मोबाईल नंबर : ९०४९७८६३३३.