फसव्या गुंतवणूक योजना कशा ओळखायच्या

फसव्या गुंतवणूक योजना कशा ओळखायच्या: CA राम डावरे यांचे मार्गदर्शन! 🚨

बेन्जामिन ग्राहम हा अमेरिकी गुंतवणूकदार फार महत्वाचे वाक्य बोललेला आहे ते हे कि गुंतवणूकदारांचा खरा शत्रू दुसरा कोनिही नसून तो स्वताच असतो. फसव्या गुंतवणूक योजना खूप असतात त्या कशा ओळखायच्या या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे सोशल मिडिया, वर्तमानपत्र, दूरचित्रवाहिनी आणि इतर माध्यमातून फसव्या योजनांची अनेक उदाहरणे दिली जातात. नेटवर्क मार्केटिंग पद्धत ही सुद्धा फसव्या योजनेत वापरली जाते.

फसव्या योजनेत आकर्षक अशा व बँक एफ डी, पोस्टल स्कीम, पी पी एफ पेक्षा खूप जास्त व्याजदर दिला जातो. अनेक वेळा कमी कालावधीत पैसे दुप्पट करून देण्याच्या योजनांना लोक भुलतात आणि त्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. सगळेजण गुंतवणूक करत असतात ज्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो तिथे गुंतवणूकदार प्राधान्य देतात. आर्थिक गुंतवणूक करताना अनेक वेळा जास्त व्याजदरबाबत आमिष दाखवले जाते. मात्र या मागची सत्यता गुंतवणूकदाराने पडताळून पाहायला हवी. आकर्षक परतावा देणाऱ्या योजना चुकीच्या असू शकतात. जगातील कोणतीही व्यक्ती स्वतःचे नुकसान होऊन दुसऱ्याचा फायदा करून देत नाही.

गुंतवणूक करताना काही विशिष्ट काळजी घेणे गरजेचे असते. त्यासंबंधी योजनांची माहिती काढल्याशिवाय कुठेही गुंतवणूक करू नये. फसव्या गुंतवणूक योजेनांमध्ये आजपर्यंत लोकंचे लाखो रुपये बुडाले तरीही जुन्या बाटलीत नवीन दारू विकणे (new wine in old bottle) व लोकांना फसविणे हे प्रकार वर्षा नु वर्षे सुरूच आहे आणि विशेष म्हणजे लोक सुद्धा ह्या फसव्या फसतात कारण ते स्वःताच त्यांचे दुश्मन असतात.

गुंतणूक योजेमध्ये फसवणूक होणार नाही यासाठी काय काळजी घेणे जरुरी आहे त्याबद्दल थोडी माहिती आपण जाणून घेवू:

फसवणूक टाळण्यासाठी काय करावे? 🛡️

  1. रोख व्यवहार टाळा (Avoid Cash Transactions): 🚫
    • फसव्या योजनांमध्ये पैसे गुंतवत असताना रोख पैशाचे व्यवहार करा असा गुंतवणूकदारांना सल्ला दिला जातो.
    • रोख पैशाचे व्यवहार करण्यापेक्षा ऑनलाईन किंवा चेकच्या माध्यमातून व्यवहार करावेत पुरावा म्हणून या दोन्हीला अधिकृत समजले जाते. चेक आणि ऑनलाईन व्यवहार केल्यावर त्याची नोंद बँकेकडे राहते.
    • पुढे काही याबबत वाद झाला तर कोर्टात फक्त लेखी पुरावा ग्राह्य धरला जातो. जिथे रोख व्यवहाराचा आग्रह धरला जातो तिथं शंका उपस्थित करा व सजग व्हा.
  2. शेअर बाजारातील हमी (Guaranteed Returns in Stock Market): 🚩
    • शेअर बाजारातून कोणीही खात्रीशीर परतावा मिळवून देऊ शकत नाही. त्यामुळे असे सांगणाऱ्या भूलथापांना बळी पडू नका .
    • शेअर बाजारातील इक्विटी मधून खात्रीशीर परतावा मिळत असता तर सर्रास लोकांनी शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवले असते.
    • शेअर ब्रोकर सोबत व्यवहार करताना रोख व्यवहार करू नका . स्वताचे डी मॅट खाते अधिकृत ब्रोकर कडे उगडून त्यात तुम्ही खरेदी केलेले शेअर्स दिसतात का याची मधून मधून पडताळणी करावी .
    • शेअर बाजार म्हणजे असंयमी लोकांकडून संयमी लोकांकडे पैसे जाण्याची पद्धत आहे असे वॉरेन बफेट यांनी सांगितले आहे .
    • हल्ली मार्केट मध्ये मला तुम्ही चेकने पैसे द्या मी शेअर बाजारात ट्रेडिंग करून तुम्हाला दर महिन्याला परतावा देतो असे सांगणारे खूप लोक आहे परंतु शेअर बाजार व म्युचल फंड हे वर्षाला किती परतावा देतात याचा काही इतिहास आहे त्यापेक्षा जास्त परतावा कुणीही देऊ शकत नाही.
  3. गुंतवणुकीतील धोका (Risk Assessment): ⚠️
    • कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याच्या आधी त्यात जोखीम किती आहे हे माहित करून घेणे गरजेचे असते. त्यासाठी गुंतवणूक सल्लगारचा सल्ला जरूर घाव्या.
    • फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग प्रकरणात गुंतवणूक करताना काळजी घेणे आवश्यक असते अशा कोणत्याही पर्यायात गुंतवणूक करण्याच्या आधी धोके कोणते हे समजून घ्यायला हवेत कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीची पूर्ण माहिती काढून ठेवावी.
  4. नियामक संस्थेकडे नोंदणी (Regulatory Compliance):
    • गुंतवणूक करणारी संस्था सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) या सरकारी नियमकाकडे नोंदणी केलेली किवा भारतीय रिझर्व बँकेने (RBI) किवा सदर संस्था कंपनी कार्य मंत्रालय (आर ओ सी) ने तिला मान्यता दिलेली आहे की नाही याची चौकशी करावी.
    • तसेच तिच्या गुंतवणूक योजनांना सुद्धा परवानगी आवश्यक आहे. हे असेल तर तुम्हाला संबंधित नियमकाकडे तक्रार करणे सोपे जाते.
  5. जास्त परताव्याचे आमिष (High Returns – A Red Flag): 🚩
    • कोणत्याही योजना फसवी असल्याची सर्वात जास्त परतावा हेच पहिले लक्षण असते सरकारी योजनांपेक्षा जास्त परतावा देणाऱ्या योजनांमध्ये शक्यतो गुंतवणूक करू नये जास्त परतावा देणाऱ्या योजनेवर विश्वास ठेवू नये शेअर बाजार किंवा इतर ठिकाणी जास्त परतावा देणारा कोणत्या योजनेला भुलू नये गुंतवणूक करताना संबंधित योजनांची माहिती काढावी खात्रीशीर वाटली तरच गुंतवणूक करावी गरज वाटली तर आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा.
  6. सामाजिक दबाव (Social Pressure): 🤝
    • अनेक वेळेस मित्र नातेवाईक किवा आपल्या जवळचे लोक काही योजना घेऊन आपल्याकडे येतेत व त्यात गुंतणूक कारणाचा आग्रह करतात . आम्ही ह्या योजनेत पैसे टाकले आहे तुम्ही पण टाका असा दबाव टाळावा व योग्य माहिती घेऊनच गुंतवणूक करवी .
    • रियल इस्टेट डेव्हलपमेंट कंपन्यानि अश्या अनेक योजना काढल्या होत्या त्यात अनेक लोकांचे पैसे बुडालेले आहे.
  7. एकाची टोपी दुसऱ्याला (Ponzi Scheme): 🎩
    • फसव्या योजनांची एक खासियत असते की ते एकाचे पैसे आले की त्यातून पहिल्या गुंतवणूकदाराला व्याज देतात .
    • गुंतवणूक योजना काय आहे, तिचे व्यवसाय मॉडेल काय आहे ती व्याज व पैसे कुठून परत करणार आहे ह्याचा सखोल अभ्यास करावा.
    • टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या अश्या फसव्या योजना कधी मार्केट मध्ये दिसल्या नाही हे सर्व जण एक व्यवसाय मॉडेल तयार करून त्यातून नफा कमवतात व गुंतवणूकदारणा व्याज किंवा परतावा देतात.
  8. सुवर्ण संधी गमावण्याचे भय (Fear Of Missing Out – FOMO): 😟
    • अनेक वेळा फसव्या जाहिराती दिल्या जातात जसे की गुंतवणुकीची सुवर्ण संधी, शेवटचे तीन दिवस, आता नाही तर कधी नाही . हे सर्व फंडे समजून घेणे गरजेचे आहे. घाई करणे टाळा.
  9. शॉर्ट कट विल कट यू शॉर्ट (Shortcuts): ✂️
    • झटपट श्रीमंत होणे कुणाला आवडत नाही सर्वांना पण जे लोक श्रीमंत झाले आहे त्यांनी काही नियम आणि अर्थिक शिस्त पाळली आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
    • श्रीमंत होण्याचा कुठलाही शॉर्ट कट नाही . शॉर्ट कट लवकरच तुम्हाला कट (कंगाल)करतो हे समजून घ्यावे.
  10. पिरॅमिड योजना व मल्टी लेव्हल मार्केटिंग (Pyramid Schemes vs MLM): 🏢
    • पिरॅमिड योजनेमध्ये कुठलेही प्रॉडक्ट विकण्यासाठी नसते फक्त एकाकडून कडून पैसे घेणे आणि त्यातून दुसऱ्याला व्याज देणे हा प्रकार असतो सुरवातीला हे अगदी आकर्षीत करणारे असते पण नंतर पैसे येणे संपले की हा एक मोठा फुगा असतो व तू फुटतो.
    • मल्टी लेव्हल मार्केटिंग मध्ये काहीतरी प्रॉडक्ट विकण्यासाठी असते हे प्रॉडक्ट विकून त्याच्या जो फायदा होणार आहे त्या फायद्यामध्ये सर्वांना भागीदार केले जाते. त्यामुळे मल्टी लेवल मार्केटिंग आणि पिरॅमिड योजना याच्यामध्ये फरक आहे.
    • तसेच मल्टी लेवल मार्केटिंग मध्ये सुद्धा कुठले प्रॉडक्ट विकले जातात ते कुठल्या किमतीला विकले जातात हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे अनेक वेळेस मल्टी लेवल मार्केटिंग मध्ये सुद्धा काही प्रॉडक्ट खूप महाग किंवा जास्त किमतीला विकले जातात आणि त्यातून मग मोठ्या प्रमाणात परतावा दिला जातो परंतु अशा स्कीम फार काही जास्त दिवस चालत नाही.

गुंतवणूकदार स्वतः किती संयमी आहे ह्यावरच तुमची फसवणूक होणार की नाही हे ठरत असते. काही लोक प्रेमात पडायला नेहमी तयार असतात त्यापेक्षाही जास्त ते इतरांकडून फसवणूक करवून घेण्यास नेहेमी तत्पर असतात.

📖🖋️ब्लॉग लेखन :
CA राम डावरे
मोबाईल नंबर : 9049786333

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *