
💰 श्रीमंत होणे: नशीब ,योगायोग कि दुसरे काही ? 🌟
मागील महिन्यात एका उद्योजकता विकास सेमिनार मध्ये नव द्योजकांना मार्गदशन करत असताना एकाने मला प्रश्न विचारला कि श्रीमंत होणे याला नशीब लागते ,कि पूर्वजन्माची पुण्याई लागते कि खूप कष्ट करावे लागतात यावर आम्हाला सांगा . असे प्रश्न तर सर्वांनाच पडत असतात .
🤔 प्रश्न तर सर्वांनाच पडत असतात 🤷♂️
परवा सकाळी असेच ऑफीजवळ चालत होतो अचानक कडाडकड सप सप असा आवाज कानावर आला म्हणून वळून बघितले तर एक पोतराज याला आपण कडकलक्ष्मी म्हणतो तो अंगावर चाबकाचे फटकरे मारून घेत होता .तो स्वतःला मारून घेत होता पण वळ मात्र माझ्या पाठीवर उठत होते व प्रत्येकालाच असा अनुभव येतो . अस तो प्रत्येक दुकानासमोर जाऊन स्वतःला फटके मारून घेत होता आणि लोक त्याला पैसे देत होते .
हे स्वतःला फटके मारणे लोकांची सहानुभूती मिळून पैसे मिळवण्यासाठी असते. यावरून कुठं तरी ऐकलेले व वाचलेले भावगीत मला आठवले
“विठ्ठला कारे ताडन करिसी तूच स्वतःला ।।अपराध माझे आपले मानून का रे ताडन करिसी ।।”
🚀 आदिमानवापासून मानवाची अभिलाषा : वरचढ होण्याची 🏆
आदिमानव काळापासून आपण इतरांपेक्षा वरचढ व्हावे इतरांना मागे टाकावे ही माणसाची अभिलाषा आहे ही त्याची नैसर्गिक प्रेरणा आहे व ती उपजत आहे. ही प्रेरणा जीवन जगायला फार मोठा आधार आहे. ही प्रेरणा नसती तर या पृथ्वीवर मनुष्य धड पणे जगू शकला नसता.
- ऋग्वेद काळी : गाय ही संपत्ती मानली गेली होती ज्याच्याकडे खूप गायी असत तो श्रीमंत मानला जाई
- पुढे त्यात अनेक प्राणी : जसे कि घोडे ,गाढव इ वरून श्रीमंती ठरू लागली .
- पुढे माणसांना जमिनीचे महत्व कळले : जमिनीत पिके काढून श्रीमंत होता येते हे जेव्हा त्याला समजले तेव्हा अधिकाधिक जमिनीची अशा बाळगू लागला .
- धातू ,खनिजसंपत्ती व सोन्या चांदी ला महत्त्व आले : तेव्हा सोन्यासाठी जीव टाकू लागला.
⚔️ जगातील बहुतेक सर्व लढाया ह्या अधिक जमीन , अधिक संपत्ती मिळावी म्हणून झाल्या आहेत 💰
लोखंडापासून सोने बनवता येईल म्हणून परिस शोधन्यासाठी जीवाचे रान करू लागला. कोलंबसाने शोधलेली अमेरिका, वास्को-दी-गामांचा हिंदुस्तान चा प्रवास याच लालशेपायी झाला. सोन्याच्या हव्यासापाई युरोपमधून टोळ्या जगाच्या अज्ञात भागावर जीवावर उदार होऊन प्रवेश करू लागल्या. जगातील बहुतेक सर्व लढाया ह्या अधिक जमीन , अधिक संपत्ती मिळावी म्हणून झाल्या आहेत. मानव जातीच्या साऱ्या संघर्षाचे मूळ संपत्ती आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही.
✨ श्रीमंत बनण्याची अधिक सुखी होण्याची मानवाची मूलभूत प्रेरणा आहे व ती नैसर्गिक आहे 💫
श्रीमंत बनण्याची अधिक सुखी होण्याची मानवाची मूलभूत प्रेरणा आहे व ती नैसर्गिक आहे . ही प्रेरणा प्रत्येक व्यक्तीत आहे पण फारच थोडे लोक ही प्रेरणा पुरी करू शकतात. बाकीचे आपली ही इच्छा कधीतरी पूर्ण होईल या आशेवर जगत असतात व नशिबाने जेव्हा मिळेल तेव्हा बघू यावर समाधान मानतात .
❓ आता काही व्यक्तीच खूप श्रीमंत होतात बाकीचे कुठेतरी रेंगाळतात व मागे राहतात असे का ? नशिबानेच माणसाला पैसा मिळतो का ? 🤔
टाटा बिर्लाच्या घरी जन्माला येणे व एखाद्या गरीबाच्या घरी जन्म घेणे ही नशीबाचीच बाब आहे का ?. पण त्याप्रमाणे एखाद्याला लॉटरीत पाच लाख रुपयाचे बक्षीस मिळते व इतर आपला एक रुपया गमावून बसतात याला नशिबाशिवाय दुसरे नाव देता येणार नाही.
🍀 श्रीमंत बनण्याचा नशिबाचा भाग आहे हे आपल्याला काही प्रमाणात मान्य करावे लागेल 🍀
नशिबाचे आपल्याला दोन-तीन भाग करावे लागतील त्यात पहिला आहे तोंडात चांदीचा चमचा घेऊन श्रीमंताच्या घरी जन्माला येणे यात सुद्धा आहे ती संपत्ती टिकविणे किंवा वाढविणे बऱ्याच लोकांना शक्य होत नाही ,दुसरा जुगारात एकदम घबाड मिळणे यात सुद्दा संपत्ती वाढविणे आणि टिकविणे म्हत्वाचे आहे व तिसरा गुप्तधन मिळणे जसे कि कुणी नातेवाईक अपत्यहीन होऊन मरणे व ती संपत्ती दुसऱ्याला किंवा नातेवाईकाला मिळणे .
🎰 यापैकी जन्म वारसा हक्क यासाठी माणसाला काहीच प्रयत्न करावे लागत नाही 🎲
यापैकी जन्म वारसा हक्क यासाठी माणसाला काहीच प्रयत्न करावे लागत नाही, गुप्तधन पण पुष्कळ अंशी चालून येणारी संपत्ती आहे. रेस ,जुगार किंवा लॉटरी या दोन्ही मार्गाने येणारी संपत्ती मिळावण्यासाठी नशिबाबरोबर प्रयत्नाची साथ लागते.
😠 जुगार माणसाची उपजत प्रेरणा आहे 😠
जुगार माणसाची उपजत प्रेरणा आहे प्रत्येक मनुष्य लॉटरीचे तिकीट घेत असतो समाजातील एक गट नियमितपणे मटका खेळतो . आता तर ड्रीम इलेव्हन सारखे कायदेशीर जुगार अड्डे तयार केले आहे त्यात अनेक तरुण पैसे गमावत आहे . आता जुगारी प्रवृत्ती महाभारतापासून माणसात आहे. यापुढेही कायम राहणार आहे आणि कायद्याने बंद सुद्धा होणार नाही कारण त्यापासून सरकारला टॅक्स महसूल मोठ्या प्रमाणात मिळतो . जुगार लाखो माणसे खेळतात पण एखाद्यालाच त्यात यश येते. आणि हे सर्व काहीही काम न करता बिनकष्ट पैसे मिळविणे किंवा श्रीमंत होणे यासाठी सुरु असते.
💡 मग श्रीमंत होण्यासाठी दुसरा काही मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे का ? 🚀
मग श्रीमंत होण्यासाठी दुसरा काही मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे का कि वरील तीन प्रकार सोडले तर माणूस श्रीमंत होऊच शकत नाही का ? तर तो मार्ग म्हणजे आपल्या कामात कल्पकता( क्रिएटिव्हिटी ) व नावीन्य( इनोव्हेशन ) आणणे हा आहे .
🧑💻 आपण आदिमानवापासून जर बघितले तर जे जे लोक व्यवसाय उद्योग किंवा इतर शोध लावून मोठे झाले आहे त्यांनी नेहमी कल्पकता आणि नाविन्य हे दोन गुण स्वीकारले आहे. 🧑💻
आपण आदिमानवापासून जर बघितले तर जे जे लोक व्यवसाय उद्योग किंवा इतर शोध लावून मोठे झाले आहे त्यांनी नेहमी कल्पकता आणि नाविन्य हे दोन गुण स्वीकारले आहे. कुठल्याही शोधाची तुम्ही पार्श्वभूमी बघा त्यामध्ये कल्पकता आणि नाविन्य हे तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला कल्पकता आणि नाविन्याने श्रीमंत होता येते .
😩 आपली हिंदू माणसाची जीवनाकडे बघण्याची एकूण प्रवृत्ती ही दैववादी असल्यामुळे प्रत्येक घडणाऱ्या घटनेत खूप खोल न जाता त्याला योगायोग, नशीब म्हणण्याची आपली प्रवृत्ती ही कल्पकतेला फार फार मारक आहे 🚧
आपली हिंदू माणसाची जीवनाकडे बघण्याची एकूण प्रवृत्ती ही दैववादी असल्यामुळे प्रत्येक घडणाऱ्या घटनेत खूप खोल न जाता त्याला योगायोग, नशीब म्हणण्याची आपली प्रवृत्ती ही कल्पकतेला फार फार मारक आहे. आपला हिंदू मनुष्य मग तो उच्चशिक्षित किंवा निरक्षर असो नशिबावर एवढा काही अवलंबून असतो की विचारता सोय नाही. प्रत्येक गोष्टीवर तो नशिबाचा शिक्का मारत असतो. कसलीच कारणमीमांसा न करता घडणाऱ्या सर्व गोष्टींना नशीब म्हणणे ही वृत्ती हिंदू माणसाच्या हाडामांसासी खिळली आहे व त्यामुळेच करोडो लोक दारिद्यात खितपत पडले आहे .
🙏 तो रामाला आणि कृष्णाला जीवापाड मानतो पण भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला कर्मयोग त्याला नीट कळत नाही 🙏
तो रामाला आणि कृष्णाला जीवापाड मानतो पण भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला कर्मयोग त्याला नीट कळत नाही . श्रीकृष्ण जरी अर्जुनासोबत होते तरीही प्रत्यक्ष युद्ध हे अर्जुनालाच करावे लागले . श्रीकृष्णाचे एकूणच जीवन हे कल्पकता व नावीन्य यांनी भरलेले होते. आणि दुसरे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुद्धा जीवन हे कल्पकता व नावीन्य यांनी भरलेले होते . ह्या महापुरुषांची आपण फक्त जयंती साजरी करतो त्यातून काहीही शिकत नाही आणि परत दैवयोग ,नशीब , योगायोग याला मिठी मारत बसतो .
🧠 कोणत्याही गोष्टीत नाविन्यांनी त्यात कल्पकता आणणे ही तशी पाहिले तर फार मोठी अवघड गोष्ट नाही 🎯
कोणत्याही गोष्टीत नाविन्यांनी त्यात कल्पकता आणणे ही तशी पाहिले तर फार मोठी अवघड गोष्ट नाही थोडा सराव अनुभव, अभ्यास ,निरीक्षण यांनी सहज साधणारी गोष्ट आहे . पण आपण कल्पकता आणण्याचा प्रयत्न करत नाही. आणि ह्या आळसा मुळेच सर्व शोध लागले आहे . माणसाला कमी कष्टात सर्व सुखसोयी हव्या असतात आणि त्यातूनच मग कल्पकतेचा व नाविन्याचा जन्म होतो .
🧳 पायी चालून हजारो कि मी चा प्रवास करण्याचा त्याला कंटाळा आला म्ह्णून तो घोड्यावर बसून प्रवास करू लागला , नंतर सायकल आली त्यानंतर मोटारसायकल आली ,त्यानंतर कार आली व आता विमान आहे आता आजून सुद्दा तो हायपर लूप च्या माध्यमातून प्रवासाचा वेळ कमी करू पाहत आहे. ✈️
पायी चालून हजारो कि मी चा प्रवास करण्याचा त्याला कंटाळा आला म्ह्णून तो घोड्यावर बसून प्रवास करू लागला , नंतर सायकल आली त्यानंतर मोटारसायकल आली ,त्यानंतर कार आली व आता विमान आहे आता आजून सुद्दा तो हायपर लूप च्या माध्यमातून प्रवासाचा वेळ कमी करू पाहत आहे.
👍 हे सर्व घडले कल्पकतेतून आणि ज्यांनी ज्यांनी हे आरामदायी शोध लावले ते श्रीमंत होत गेले 🏆
हे सर्व घडले कल्पकतेतून आणि ज्यांनी ज्यांनी हे आरामदायी शोध लावले ते श्रीमंत होत गेले. श्रीमंत होण्यासाठी कल्पकता कोणी वापरली तर त्याला लांडी लबाडी फसवणूक वगैरे म्हणता येणार नाही पूर्वीपासून दाढी करण्यासाठी मनुष्य न्हाव्याच्या दुकानात जाऊन वस्तऱ्याने दाढी करत होता एका कल्पक माणसाने जिलेट ब्लेड काढून झटपट घरच्या घरी दाढी करता येते हे लोकांना पटवून दिले लोकांचा वेळ पैसा वाचू लागला व लोकांनी जिलेट ब्लेडचा वापर सुरू केला त्या कल्पक माणसाला तुफान पैसा मिळू लागला या कल्पकतेत कसली आली आहे लांडी लबाडी किंवा फसवणूक.
🚕 पूर्वी टॅक्सी पकडायला तुम्हाला टॅक्सी स्टॅन्ड वर जावे लागायचे आता ओला टॅक्सी तुमच्या घरी येते हे झाले नावीन्य आणि कल्पकता . त्या ओलाच्या मालकीची एक सुद्धा कर नाही तरी त्याला पैसे मिळतात. 📱
पूर्वी टॅक्सी पकडायला तुम्हाला टॅक्सी स्टॅन्ड वर जावे लागायचे आता ओला टॅक्सी तुमच्या घरी येते हे झाले नावीन्य आणि कल्पकता . त्या ओलाच्या मालकीची एक सुद्धा कर नाही तरी त्याला पैसे मिळतात.
💖 कल्पकतेचा उपयोग धन मिळविण्यासाठी करावा व त्यातून श्रीमंत होताही येते . कल्पकता आणि नाविन्य सोबतच श्रीमंत होण्यास तुमची वृत्ती आशावादी असायला हवी ✨
कल्पकतेचा उपयोग धन मिळविण्यासाठी करावा व त्यातून श्रीमंत होताही येते . कल्पकता आणि नाविन्य सोबतच श्रीमंत होण्यास तुमची वृत्ती आशावादी असायला हवी. आशावादी मनुष्यच भव्य दिवस स्वप्ने पाहू शकतो ,ती स्वप्ने मनात रंगवू शकतो ती अमलात आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो .
😊 आशावादी माणसांमध्ये एक विलक्षण गुण असतो त्याच्या जोरावर तो जगातील कसलेहि दुःख संकटे पार करू शकतो . त्याची जिद्द आश्चर्यकारक असते त्याचा आशावाद कमालीचा दांडगा असतो 💪
आशावादी माणसांमध्ये एक विलक्षण गुण असतो त्याच्या जोरावर तो जगातील कसलेहि दुःख संकटे पार करू शकतो . त्याची जिद्द आश्चर्यकारक असते त्याचा आशावाद कमालीचा दांडगा असतो. कसल्याही संकटाने तो नामोहरम होत नाही आणि कुठलेहि दुःख त्याला फार पराभूत करू शकत नाही.
🌟 या जगात ज्यांनी ज्यांनी आपल्या देशाला आपल्या समाजाला आपल्या कुटुंबाला उर्जितावस्था प्राप्त करून दिली आपले व आपल्या कुटुंबाचे नाव रोशन केले त्या सर्वांनीच साधना, कल्पकता, नाविन्यता , आशावादीपणा , अपार कष्ट घेण्याची तयारी ठेवली म्हणून हे घडले आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे. यात नशीब आणि योगायोगाला ला कुठेही स्थान नाही ✨
या जगात ज्यांनी ज्यांनी आपल्या देशाला आपल्या समाजाला आपल्या कुटुंबाला उर्जितावस्था प्राप्त करून दिली आपले व आपल्या कुटुंबाचे नाव रोशन केले त्या सर्वांनीच साधना, कल्पकता, नाविन्यता , आशावादीपणा , अपार कष्ट घेण्याची तयारी ठेवली म्हणून हे घडले आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे. यात नशीब आणि योगायोगाला ला कुठेही स्थान नाही .
🚫 श्रीमंत होणे म्हणजे दुसऱ्याला लुबाडणे अजिबात नव्हे 🤝
श्रीमंत होणे म्हणजे दुसऱ्याला लुबाडणे अजिबात नव्हे दुसऱ्याच्या दुबळेपणाचा फायदा घेणे हे सुद्धा नव्हे. श्रीमंत होणे म्हणजे नवीन उपक्रमशीलता निर्माण करणे लोकांच्या सुख सोयीत भर घालणे लोकांना वेगळी अशी चालना देणे त्यांची जाणीव वाढवणे हे होय.
💼 कल्पकता ,नाविन्यता , आशावादी प्रवृत्ती हि फक्त व्यवसायातच असावी लागते असे नाही . नोकरी व विविध कला क्षेत्रात सुद्दा याला पर्याय नाही . आज अनेक व्यवसाय हे नावीन्य किंवा कल्पकता नसेल तर बंद पडतात 🏢
कल्पकता ,नाविन्यता , आशावादी प्रवृत्ती हि फक्त व्यवसायातच असावी लागते असे नाही . नोकरी व विविध कला क्षेत्रात सुद्दा याला पर्याय नाही . आज अनेक व्यवसाय हे नावीन्य किंवा कल्पकता नसेल तर बंद पडतात . तुमच्या व्यवसाय उद्योगात काही नाविन्य नसेल तर तो व्यवसाय उद्योग सुरु न करणे हेच शहाणपणाचे ठरते . नोकरी ,उद्योग ,व्यवसाय यात मिळालेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्यात वाढ करणे हे सुद्दा श्रीमंत होण्यासाठी आवश्यक आहे .
📚 आज इंटरनेट आणि सोशल मीडियात खूप माहिती व ज्ञान उपलब्ध आहे त्यासाठी तुम्हाला कुठं जायची गरज नाही पण जे ज्ञान उपलब्ध आहे ते फक्त कच्चा माल आहे . 🌐
आज इंटरनेट आणि सोशल मीडियात खूप माहिती व ज्ञान उपलब्ध आहे त्यासाठी तुम्हाला कुठं जायची गरज नाही पण जे ज्ञान उपलब्ध आहे ते फक्त कच्चा माल आहे . ह्या ज्ञानाचा कल्पकतेने चातुर्याने उपयोग करायला शिकले पाहिजे तरच तुम्ही श्रीमंत होणार आहे .
🔭 त्यासाठी नजर नेहमी शोधक असायला हवी 🤓
त्यासाठी नजर नेहमी शोधक असायला हवी . आपल्या परंपरा, आपले राहणीमान, आपली दैवते, आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, आपली विचारसरणी याचा अभ्यास करून यात काय नावीन्य ( इनोव्हेशन ) व कल्पकता ( क्रिएटिव्हिटी ) आणता येईल हे जमले पाहिजे . कसलीही नावीन्य नसलेली गोष्ट चुकूनही कुणावर लादु नका त्यात तुमचा वेळ आणि पैसे बरबाद होत असतात .
🧘♂️ सतत चिंतन , मनन , लोकांशी विचार विनिमय , एखाद्या गोष्टीचा वेडा ध्यास घेतल्यावर त्यात कल्पकता व नावीन्य आपोआप सुचत असते 💭
सतत चिंतन , मनन , लोकांशी विचार विनिमय , एखाद्या गोष्टीचा वेडा ध्यास घेतल्यावर त्यात कल्पकता व नावीन्य आपोआप सुचत असते . मनुष्य स्वतःला केंद्रबिंदू ठेवून जगात असतो . त्याचा स्व नेहमी आनंदात राहावा असे त्याला वाटत असते .
😊 स्वतःचे शरीर जिवंत राहावे , निरोगी राहावे व सुख व आनंद मिळावा ह्याला मनुष्य प्रथम पसंती देत असतो 💖
स्वतःचे शरीर जिवंत राहावे , निरोगी राहावे व सुख व आनंद मिळावा ह्याला मनुष्य प्रथम पसंती देत असतो. जीवन जगतानाची वरील सर्व मूल्य त्याला कमी कष्टात ,कमी वेळेत व कमी खर्चात मिळाली तर तो व एकूणच समाज तो मार्ग पत्करतो . म्हणूनच ह्या सर्वांमध्ये कल्पकता व नावीन्य जो कुणी आणेल तो श्रीमंत होत जाईल .
🏆 गेल्या २० वर्षात झालेले अरोबोपती बघा यातील ७५ % हे कुठलीही श्रीमंतीची प्राश्वभूमी नसताना केवळ कल्पकता व नावीन्य ह्या जोरावर त्यांनी हे स्थान मिळविले आहे 📈
गेल्या २० वर्षात झालेले अरोबोपती बघा यातील ७५ % हे कुठलीही श्रीमंतीची प्राश्वभूमी नसताना केवळ कल्पकता व नावीन्य ह्या जोरावर त्यांनी हे स्थान मिळविले आहे . तुम्ही कुठेही काम करत आसा तुमच्याकडे कल्पकता व नावीन्य नसेल तर तुम्ही स्पर्धेतून कधी बाहेर फेकले जाल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही . आणि विशेष म्हणजे कल्पकता व नावीन्य हे सतत चालत असणारी प्रकिया आहे .
⚔️ संघर्ष हा मनुष्यजातीच्या आदिम काळापासून नैसर्गिक कायदा राहिला आहे 🛡️
संघर्ष हा मनुष्यजातीच्या आदिम काळापासून नैसर्गिक कायदा राहिला आहे . डार्विनचा उत्क्रांतीवाद हेच सांगतो कि मानव व प्राणिमात्र जे इतरांपेक्षा शरीराने बुद्धीने वरचढ होते तेच ह्या जीवन संघर्षात तरले गेले . जे दुर्बल होते त्याचा वंशच ह्या पृथ्वीवरून नाहीसा झाला .
✅ आपल्याला आता आदिमकाळइतका संघर्ष नसेल पण श्रीमंत होणे हे काही नशीब आणि दैवीकृपा नाही हे सुद्धा तितकेच खरे 🎉
आपल्याला आता आदिमकाळइतका संघर्ष नसेल पण श्रीमंत होणे हे काही नशीब आणि दैवीकृपा नाही हे सुद्धा तितकेच खरे .
ब्लॉग लेखन : सी ए राम डावरे , मोबाईल : ९०४९७८६३३३.