खऱ्या गरजू बहिणींचा सरकार शोध घेणार का ? 

🤔 खऱ्या गरजू बहिणींचा सरकार शोध घेणार का? 🔎

सध्या तरी सरकारने फक्त एका हमीपत्रावर ज्या महिलांनी अर्ज केले आहेत, त्या सर्वांना पैसे दिले आहेत. त्यामुळे अनेक अपात्र लाडक्या बहिणींनी ज्याला आपण श्रीमंत लाडक्या बहिणी म्हणू त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे. यावरती खूप टीका पण झाली की, राज्य शासनाचे एवढे उत्पन्न नाही, राज्य शासनावरती खूप कर्ज वाढत आहे तरीही ही योजना कशासाठी?

✅ गरजू बहिणींना मदत योग्य, पण सरसकट वाटप चुकीचे ❌
वर सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणीला पैसे देणे हे योग्यच आहे, परंतु सरसकट अर्ज केलेल्या सर्व महिलांना पैसे देणे हे चुकीचे आहे.

💸 फुकट काही मिळत नाही: करदात्यांचा पैसा 🌍
वर सांगितल्याप्रमाणे एखादी गोष्ट जर तुम्हाला फुकट मिळत असेल तर त्यासाठी कुणीतरी पैसे दिलेले असतात आणि या सर्व फुकट योजना या करदात्यांच्या पैशातून आलेल्या उत्पन्नातून चालत असतात.

👥 करदात्यांचे दोन प्रकार 🔢
करदात्यांमध्येसुद्धा दोन प्रकार आहेत.

  • आयकर दाता (प्रत्यक्ष करदाता)
  • अप्रत्यक्ष करदाता

💰 GST: केंद्र व राज्याला उत्पन्न 🤝
आयकाराचे सर्व उत्पन्न हे केंद्र शासनाला जाते, परंतु जे अप्रत्यक्ष कर आहे त्यामध्ये विशेष करून जीएसटी याचे उत्पन्न केंद्र आणि राज्य शासनाला दोघांनाही जात असते.

🧾 प्रत्येक नागरिक करदाता 🌍
म्हणजेच जी काही योजना आहे, मग ती लाडकी बहीण योजना असो किंवा कुठलीही योजना ज्याचे थेट पैसे बँकेत जातात ते पैसे हे करदात्यांचे पैसे असतात आणि आता तर जीएसटीमुळे प्रत्येक नागरिक हा करदाता आहे.

🛍️ वस्तू व सेवांवरील कर 🛒
तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे काही वस्तू आणि सेवा वापरता, त्यात तुम्हाला ५ टक्क्यांपासून २८ टक्क्यांपर्यंत आणि पेट्रोलियम प्रोडक्टच्या बाबतीत ५२ टक्क्यांपर्यंत जीएसटी भरावा लागतो.

🎯 योजनेचा उद्देश असफल 🎯
सर्व करदाते आहेत, परंतु या कराचे पैसे जर अपात्र आणि श्रीमंत लाडक्या बहिणींना जात असतील तर या योजनेचा उद्देशच असफल होतो.

Blog by : CA Ram Daware

Mob No. 9049786333.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *